Share Market Today Sakal
Share Market

2023 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात नफा कमवायचा आहे? इंट्राडेमध्ये 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: 2023 च्या शेवटच्या एक्सपायरी दिवशी, बुल्सने बाजारात आपली पकड आणखी मजबूत केली. गुरुवारी बेंचमार्क इंडेक्स नवीन विक्रमी उच्चांक करताना दिसले. गुरुवारी सर्व सेक्टरमध्ये दमदार खरेदी झाली.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: 2023 च्या शेवटच्या एक्सपायरी दिवशी, बुल्सने बाजारात आपली पकड आणखी मजबूत केली. गुरुवारी बेंचमार्क इंडेक्स नवीन विक्रमी उच्चांक करताना दिसले. गुरुवारी सर्व सेक्टरमध्ये दमदार खरेदी झाली. चांगले जागतिक संकेत यामुळे बाजार सलग पाचव्या व्यापार सत्रात वाढीसह बंद झाला.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 371.95 अंकांच्या अर्थात 0.52 टक्क्यांच्या वाढीसह 72,410.38 वर बंद झाला आणि निफ्टी 123.90 अंकांच्या म्हणजेच टक्क्यांच्या वाढीसह 21,778.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

गुरुवारी मार्केट एका रेंजमध्ये ट्रेडिंग करताना दिसल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे डायरेक्टर आदित्य गग्गर यांनी सांगितले. निफ्टी 50 इंडेक्स 123.95 अंकांनी वाढून 21,778.70 वर बंद झाला. डेली चार्टवर आणखी एक तेजीची कँडललिस्टिंग फॉर्मेशन दिसली. पण इंडेक्स ओव्हरबॉट झोनमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे हेही लक्षात ठेवायला हवे असे ते म्हणाले.

गुरुवारी निफ्टी मजबूत राहिला आणि इंडेक्सने नवीन सर्वकालीन उच्चांक गाठल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. 21700 च्या स्ट्राइकवर मजबूत पुट रायटिंगने तेजी वाढवली आणि निफ्टीला 21800 च्या दिशेने नेले.

21700 वर निफ्टीला शॉर्ट टर्म सपोर्ट दिसत आहे. ही तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. निफ्टीने 21800 च्या वर जाऊन ताकद दाखवली तर तो 22000 चा स्तर गाठू शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • एनटीपीसी (NTPC)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M)

  • हिरो मोटो कॉर्प (HEROMOTOCO)

  • बीपीसीएल (BPCL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • एमआरएफ (MRF)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar Beef Seized: 'जुन्नरला चार गाई व दोन टन गोमांस जप्त'; जुन्नर पोलिसांची धडक कारवाई

Latest Marathi News Live Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mumbai Politics: तीन महिन्यांत ५ भेटी… ठाकरे बंधुंची युती पक्की की अजूनही चर्चा? पाहा सर्वात चर्चेत असलेली राजकीय भेटीची टाइमलाइन

Kojagiri Pournima 2025: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूर मार्ग मंगळवारपर्यंत बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT