Share Market Investment Tip Sakal
Share Market

Share Market Today: मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग? पैसे कमावण्यासाठी 'या'10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Share Market Investment Tips: काल मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाली

राहुल शेळके

Share Market Investment Tips: बुधवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर, बाजारात जोरदार विक्री झाल्यामुळे तो क्रॅश झाला. त्यामुळेच सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 931 अंकांनी घसरला आणि 70,506 वर बंद झाला.

त्याच वेळी निफ्टी 303 अंकांनी घसरून 21,150 वर बंद झाला. निफ्टी बँक 426 अंकांनी घसरून 47,445 वर बंद झाला. तर मिडकॅप 1,488 अंकांनी घसरून 44,025 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

रेकॉर्ड लेव्हलवर बियरीश कँडल बनवल्यानंतर बाजाराचा शॉर्ट टर्म ट्रेंड बियर्सच्या बाजूने वळल्याचे दिसते असे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले. पण लोअर टाइम फ्रेम्सवर हिडन बुलिश डायव्हर्जंस होण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत, निफ्टीने 21,040-21,080 या सपोर्ट झोनमधून पुनरागमन केले, तर बाजारात रिकव्हरीची आशा करू शकतो. ही रिकव्हरी 21,380 पर्यंत मर्यादित असेल.

सततच्या मंदीच्या वातावरणामुळे निफ्टीमध्ये करेक्शन दिसून आल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. निफ्टी 21500 च्या वर टिकवण्यात अयशस्वी झाले ज्यामुळे 21500 स्ट्राइकवर कॉल रायटिंग झाली.

त्यानंतर मोठी घसरण झाली. आता शॉर्ट टर्ममध्ये निफ्टीत कंसोलिडेशन दिसू शकते. निफ्टीसाठी 21500 च्या आसपास रझिस्टंस दिसत आहे तर 21100 वर सपोर्ट दिसत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • टाटा स्टील (TATASTEEL)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • पीएफसी (PFC)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • इंडियन हॉटेलल (INDHOTEL)

  • हिंदुस्थान पेट्रोलियम (HINDPETRO)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT