Share Market Investment Tips Sakal
Share Market

Share Market Today: आज इंट्राडेमध्ये कोणत्या शेअर्सची खरेदी कराल? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

Share Market Investment Tips: अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स 1 जानेवारीला किरकोळ वाढीसह सपाट बंद झाले. बाजारात विक्रमी वाढ झाल्यानंतर प्रॉफिट बुकींग झाली, त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी वरच्या पातळीवरून घसरले.

राहुल शेळके

Share Market Investment Tips: अत्यंत अस्थिर व्यापार सत्रात भारतीय बेंचमार्क इंडेक्स 1 जानेवारीला किरकोळ वाढीसह सपाट बंद झाले. बाजारात विक्रमी वाढ झाल्यानंतर प्रॉफिट बुकींग झाली, त्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी वरच्या पातळीवरून घसरले.

व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 31.68 अंकांच्या अर्थात 0.04 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 72,271.94 वर बंद झाला आणि निफ्टी 10.50 अंकांच्या म्हणजेच 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 21,741.90 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टी संपूर्ण ट्रेडिंग सत्रात अस्थिर राहिला कारण व्यापारी अनिश्चिततेच्या स्थितीत राहिल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. ऑवरली चार्टवर, निफ्टी हिरव्या रंगात बंद होण्यापूर्वी इंट्राडे 20 इएमए खाली घसरला.

आता जर निफ्टी 21650 च्या खाली घसरला तर तो आणखी कमजोर होईल. त्याच वेळी, जर वरच्या बाजूने तो 21750 च्या वर बंद करण्यात यशस्वी झाला तर त्यात आणखी तेजी येईल.

बाजाराने नवीन वर्षाची सुरुवात संथ गतीने केल्याचे प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी सांगितले. पण पीएसयू बँका आणि आयटी शेअर्सनी निर्देशांकाला तोटा भरून काढण्यास मदत केली. मिड आणि स्मॉलकॅप्समध्ये सकाळी नफा दिसला आणि फ्रंटलाइन इंडेक्सपेक्षा चांगले परफॉर्म केले.

डेली चार्टवर, निफ्टीने ग्रेव्हस्टोन डोजी कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे जो वरच्या स्तरावर विक्रीचे संकेत आहे. बियरिश डायव्हर्जंसची शक्यता अजूनही कायम आहे आणि जर त्याची पुष्टी झाली, तर यात 21,500 रुपयांपर्यंत करेक्शन पाहू शकतो. त्याच वेळी, निफ्टीने 21,800 च्या वर जाऊन ताकद दाखवली, तर तो आणखी वाढेल.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • नेले इंडिया (NESTLEIND)

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • कोल इंडिया (COALINDIA)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • पीएफसी (PFC)

  • अशोक लेलँड (ASHOKLEY)

  • भारत फोर्ज (BHARATFORG)

  • बंधन बँक (BANDHANBNK)

  • एचडीएफसी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (HDFCAMC)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Sangli Property Tax: घरपट्टीबाबत आज समितीची बैठकतालीम, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, रेडीरेकनरवर होणार चर्चा

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरू; २९ मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

SCROLL FOR NEXT