PCBL Manufacturing sakal;
Share Market

PCBL Manufacturing : 11 महिन्यात गुंतवणूक तिप्पट, या शेअरकडून गुंतवणुदारांना उत्कृष्ट परतावा...

पीसीबीएल (PCBL) या कार्बन ब्लॅक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पीसीबीएल (PCBL) या कार्बन ब्लॅक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. या शेअर्सने त्यांच्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. 21 वर्षांत या शेअरने 62 हजारांच्या गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे, तर दुसरीकडे, शॉर्ट टर्मबद्दल बोलायचे झाल्यास 11 महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट झाले आहेत. सध्या हा शेअर 247.60 रुपयांवर ट्रेड करत आहे.

पीसीबीएलचे शेअर्स 28 मार्च 2003 रोजी फक्त 1.53 रुपयांना मिळत होते. आता ते 247.60 रुपयांवर आहे म्हणजेच गुंतवणूकदार 21 वर्षांत केवळ 62 हजार रुपयांची गुंतवणूक करून कोट्यधीश झाले. या शेअरने लाँग टर्मसह शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या वर्षी, 29 मार्च 2023 रोजी, तो 108.05 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. या पातळीपासून ते 11 महिन्यांत सुमारे 218 टक्क्यांनी झेप घेत 343.35 रुपयांवर पोहोचला. या शेअर्सचा हा विक्रमी उच्चांक आहे. पण शेअर्सची ही वाढ इथेच थांबली आणि सध्या या उच्चांकापासून तो सुमारे 28 टक्के खाली आहे.

पीसीबीएल ही कंपनी कार्बन ब्लॅक तयार करते जे टायर्समध्ये रीइन्फोर्सिंग मटेरियल म्हणून वापरले जाते. अलीकडेच त्यांनीवाटर ट्रीटमेंट एंड इंडस्ट्रियल क्लीनिंग केमिकल्स स्पेसमधील स्पेशालिटीी केमिकल कंपनी एक्वाफार्म केमिकल्स कंपनी विकत घेतली. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने याला बाय रेटिंग दिले आहे. शिवाय यामध्ये गुंतवणुकीसाठी 330 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT