Investors will be rich! Do you have Spandana Sphoorty ITC PI Industries Dhanuka Agritech NMDC these five stocks in your portfolio  Sakal
Share Market

Investment Stock: गुंतवणूकदार होतील मालामाल! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत का 'हे' पाच शेअर्स?

Investment Stock: अमेरिकन बाजार तेजीत आहेत, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे.

राहुल शेळके

Investment Stock: जागतिक बाजारातून सध्या चांगले संकेत मिळत आहेत. अमेरिकन बाजार तेजीत आहेत, त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. अशात दमदार फंडामेंटल्स असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळू शकतो.

त्यामुळेच ब्रोकरेज हाऊसेसने चांगले फंडामेंटल्स असलेल्या 5 शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये स्पंदना स्फूर्ती, आयटीसी, पीआय इंडस्ट्रीज, धनुका ऍग्रीटेक, एनएमडीसी या शेअर्सचा समावेश आहे.

स्पंदना स्फूर्ती (Spandana Sphoorty)

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने स्पंदना स्फूर्तीच्या (Spandana Sphoorty) शेअर्समध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी 1,200 रुपयांचे टारगेट त्यांनी निश्चित केले आहे. सध्या हा शेअर 1,019 रुपयांवर ट्रेड करत आहे. आता यात गुंतवणूक केल्यास किमान 18 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आयटीसी (ITC)

आयटीसीच्या (ITC) शेअर्सवर ब्रोकरेज फर्म नुवामाने खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी प्रति शेअर 560 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या हा शेअर 455 रुपयांवर ट्रेड करत आहे. आता यात गुंतवणूक केल्यास किमान 23 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पीआय इंडस्ट्रीज (PI Industries)

पीआय इंडस्ट्रीजच्या (PI Industries) शेअर्सवर ब्रोकरेज नुवामाने खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी प्रति शेअर 4,233 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या हा शेअर 3,425 रुपयांवर ट्रेड करत आहे. आता यात गुंतवणूक केल्यास किमान 24 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

धनुका ऍग्रीटेक (Dhanuka Agritech)

धनुका ऍग्रीटेकच्या (Dhanuka Agritech) शेअर्सवर ब्रोकरेज नुवामाने खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी प्रति शेअर 1,132 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या हा शेअर 995 रुपयांवर ट्रेड करत आहे. यात गुंतवणूक केल्यास किमान 14 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एनएमडीसी (NMDC)

एनएमडीसीच्या (NMDC) शेअर्सवर ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओस्वालने खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी त्यांनी प्रति शेअर 210 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्या हा शेअर 191 रुपयांवर ट्रेड करत आहे. यात गुंतवणूक केल्यास किमान 10 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: गौतमी पाटीलच्या वाहनाचा अपघात प्रकरण, अपघातावेळी चालकाने मद्य प्राशन केले नसल्याचे स्पष्ट

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT