Israel-Iran War Stock Market Sakal
Share Market

Stock Market: इराण-इस्रायल संघर्षामुळे जगभरातील बाजार हादरले; भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

Israel-Iran War Stock Market: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणामुळे जगभरातील बहुतांश शेअर बाजारांना धक्का बसला आहे. महत्त्वाच्या बाजारांबद्दल बोलायचे झाले तर, युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे.

राहुल शेळके

Israel-Iran War Stock Market: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणामुळे जगभरातील बहुतांश शेअर बाजारांना धक्का बसला आहे. महत्त्वाच्या बाजारांबद्दल बोलायचे झाले तर, युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे, तर आशियातील चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरच्या बाजारात खरेदीचे वातावरण होते.

इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये विक्रीचे वातावरण होते. इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे शेअर बाजारात विक्रीचे वातावरण तयार झाले आहे. ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची भीती अधिक गडद झाली आहे. त्याचवेळी पुरवठ्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.

गुंतवणूकदार सोने आणि रोख्यांकडे वळू लागले

इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणात, गुंतवणूकदार घाईघाईने स्टॉक विकत आहेत आणि ते सुरक्षित पर्यायांकडे धावत आहेत. यामुळे यूएस ट्रेझरी बाँडचे उत्पन्न घसरत असून सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डॉलर या अमेरिकन चलनाने युरोच्या तुलनेत तीन आठवड्यांत सर्वात मजबूत पातळी गाठली आहे.

पुढे ट्रेंड काय आहेत?

अमेरिकेतील मजबूत जॉब मार्केटमुळे नोव्हेंबरमध्येही अमेरिकन फेडकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिकेचे राजकारणही बाजाराच्या हालचाली ठरवणार असून बुधवारी डेमोक्रॅट पक्षाचे टिम वॉल्झ आणि रिपब्लिकन जेडी व्हॅन्स उपराष्ट्रपतींच्या चर्चेत एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

आकडेवारी काय आहे?

अमेरिकेतील डाऊ जोन्स फ्युचर्स, S&P 500 आणि Nasdaq हे तीन निर्देशांक घसरले आहेत. Nasdaq 1.53 टक्क्यांनी घसरले, Dow Jones Futures 0.25 टक्क्यांनी आणि S&P 500 देखील 0.93 टक्क्यांनी घसरले. फ्रान्सचा CAC 0.81 टक्क्यांनी आणि जर्मनीचा DAX 0.58 टक्क्यांनी घसरणीसह बंद झाला.

S&P 500

आता आशियाई बाजाराबद्दल बोलायचे झाले तर, आज उघडलेल्या बाजारांमध्ये हाँगकाँगचा हँग सेंग 5.95 टक्क्यांनी तेजीत आहे, तर सिंगापूरचा स्ट्रेट्स टाइम्स 0.33 टक्क्यांनी वधारला आहे. जपानचा निक्केई 1.68 टक्के, दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.24 टक्के आणि इंडोनेशियाचा जकार्ता कंपोझिट 0.71 टक्क्यांनी घसरला आहे.

गांधी जयंतीनिमित्त आज भारतात शेअर बाजार बंद आहे. मात्र, गिफ्ट निफ्टी सध्या 0.89 टक्क्यांनी घसरला आहे. उद्या या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होणार आहे. त्यामुळे शेअर बाजार किती घसरणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्यात मोठी घसरण! 21 दिवसांतील नीचांकी दर; उच्चांकापेक्षा तब्बल ₹23,500 कमी; आजचा ताजा भाव पाहा

Sankashti Chaturthi 2026: 3 वर्षांनी जुळून आलाय दुर्मिळ विभुवन योग! बाप्पाच्या कृपेने मेषसह ‘या’ 2 राशींचं नशीब अचानक चमकणार, होणार धनलाभाचा वर्षाव!

Khan Sir Patna Controversy : कोचिंग सेंटर बाहेर गोळीबाराच्या आरोपावरुन खान सरांचा यु-टर्न; नेमकं काय घडलं? सांगितले सत्य

Latest Marathi News Live Update : विधानपरिषद निवडणुकीतून माघारीसाठी रात्री उशिरापर्यंत उदय सामंत यांची खलबते

Dudh Halwa: फक्त मिठाई नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला वारसा! ललितपूरच्या 'दूध हलव्या'ला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन!

SCROLL FOR NEXT