ITC Shares esakal
Share Market

ITCच्या शेअर्सचा उच्चांक, एका महिन्यात 16 टक्के वाढ

गुरुवारी इंट्रा-डेमध्ये आयटीसीच्या शेअर्सने ऑल टाईम हाय गाठला.

सकाळ डिजिटल टीम

ITC Shares : एफएमसीजी क्षेत्रातील आयटीसीच्या (ITC) शेअर्समध्ये सध्या दमदार वाढ होताना दिसत आहे. गुरुवारी इंट्रा-डेमध्ये आयटीसीच्या शेअर्सने ऑल टाईम हाय गाठला. गुरुवारी बीएसईवर 3 टक्क्यांच्या तेजीसह तो 394 रुपयांवर गेला. गेल्या एका महिन्यात त्याचे शेअर्स 16 टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल उत्कृष्ट होते, ज्यामुळे ब्रोकरेज अजुनही या शेअरबाबत सकारात्मक आहेत.

चालू आर्थिक वर्षासाठी आयटीसीचे डिसेंबर तिमाहीचे निकाल चांगले ठरले. या कालावधीत कंपनीचा नफा 21 टक्क्यांनी वाढून 5031 कोटीवर पोहोचला आहे. त्याच वेळी कंपनीच्या ऑपरेशनमधून मिळणारा महसूल वार्षिक आधारावर 2.3 टक्क्यांनी वाढला आणि 16225 कोटीवर पोहोचला.

मजबूत व्हॉल्यूम रिकव्हरीमुळे सिगारेटचा व्यवसाय दरवर्षी सुमारे 17 टक्क्यांनी वाढला. त्याच वेळी एफएमसीजी महसूल 18 टक्क्यांनी वाढून 4841 कोटी झाला आहे. हॉटेल व्यवसायाचा महसूल 50 टक्क्यांनी वाढून 712 कोटी झाला आहे. कंपनीचा एबिटदा वार्षिक आधारावर 22 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 6223.2 झाला आहे. त्याच वेळी एबिटदा मार्जिन 600 बेसिस पॉइंट्सने वाढून 38.4 टक्के झाला आहे

आयटीसीच्या शेअर्समध्ये गेल्या 1 महिन्यात 15 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्यांनी गुंतवणूकदारांना 24 टक्के परतावा दिला आहे. गेल्या वर्षभराबाबत बोलायचे झाले तर गुंतवणूकदारांना 85 टक्के नफा दिला आहे. तर गेल्या 20 वर्षांत त्यांनी तब्बल 2,186.89 टक्के परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

Latest Marathi News Live Update : जळगाव सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT