IPO Open  sakal
Share Market

IPO Open : इक्सिगोचा आयपीओ 10 जूनपासून खुला होणार

ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोची (Ixigo) मूळ कंपनी ले ट्रॅवेन्यूज टेक्नोलॉजीचा (Le Travenues Technology)आयपीओ 10 जूनला उघडणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 88 रुपये ते 93 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म इक्सिगोची (Ixigo) मूळ कंपनी ले ट्रॅवेन्यूज टेक्नोलॉजीचा (Le Travenues Technology)आयपीओ 10 जूनला उघडणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 88 रुपये ते 93 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित केला आहे. इक्सिगोचा आयपीओ 10 ते 12 जून दरम्यान बोलीसाठी खुला असेल. अँकर गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ एक ट्रेडिंग दिवस आधी, म्हणजे 7 जूनला उघडेल. कंपनी आपल्या आयपीओमध्ये 120 कोटीचे नवीन शेअर जारी करणार आहे. त्याच वेळी, कंपनीचे विद्यमान शेअरहोल्डर्स आणि गुंतवणूकदार सुमारे 6.67 कोटी शेअर्सची ऑफर-फॉर-सेल (OFS) आणतील. या शेअर्सचे एकूण किंमत अपर प्राईस बँडवर सुमारे 620 कोटी असेल. आयपीओची साईज 740 कोटी असेल. ॲक्सिस कॅपिटल, डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स आणि जेएम फायनान्शियल हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

ऑफर-फॉर-सेलद्वारे (OFS) त्यांचे शेअर्स विकणाऱ्या शेअरहोल्डर्समध्ये सैफ पार्टनर्स इंडिया IV, पीक एक्सव्हीपार्टनर्स इन्वेस्टमेंट V, आलोक बाजपेयी, रजनीश कुमार, मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स, प्लासिड होल्डिंग्स, कॅटालिस्ट ट्रस्टीशिप आणि मेडिसन इंडिया कॅपिटल एचसी यांचा समावेश आहे. सैफ पार्टनर्स आणि पीक XV चे कंपनीत अनुक्रमे 23.37 टक्के आणि 15.66 टक्के हिस्सेदारी आहे आणि ते कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत.

इक्सिगो ही एक टेक्नोलॉजी-आधारित ट्रॅव्हल कंपनी आहे जी रेल्वे, विमान, बस आणि हॉटेलद्वारे प्रवासाचे बुकिंग आणि नियोजन यावर फोकस करते. कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 23.4 कोटीचा निव्वळ नफा नोंदवला होता, तर मागील वर्षी कंपनीला 21.09 कोटीचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग नफा 32 टक्क्यांनी वाढून 501.3 कोटी झाला आहे.

आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांत, इक्सिगोचा निव्वळ नफा 252.1 टक्क्यांनी वाढून 65.7 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 18.7 कोटी होता. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या 9 महिन्यांत कंपनीचा महसूल 34.8 टक्क्यांनी वाढून 491 कोटी झाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT