Mukesh Ambani Sakal
Share Market

Jio Financial Services: गुंतवणूकदारांची प्रतीक्षा संपली! जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस 'या' तारखेला होणार लिस्ट

Jio Financial Services Listing Update: गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी

राहुल शेळके

Jio Financial Services Listing Update: मुकेश अंबानी यांच्या नवीन कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL) च्या लिस्टची वाट पाहत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 21 ऑगस्ट रोजी कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध होईल. यानंतर गुंतवणूकदार शेअर्स खरेदी आणि विक्री करु शकतील.

गेल्या वर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजने डी मर्जर प्रक्रियेअंतर्गत वित्तीय सेवा व्यवसाय वेगळे करण्याची घोषणा केली होती. कंपनीचे नाव बदलून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे ठेवण्यात आले. डी मर्जरनंतर Jio Financial Services ही या क्षेत्रातील भारतातील पाचवी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

20 जुलै रोजी, डी मर्जरच्या वेळी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे बाजार मूल्य अंदाजे 21 अब्ज डॉलर इतके होते. हे मूल्यांकन Jio Financial Services च्या 261.85 रुपयांच्या शेअरच्या किंमतीच्या आधारे केले गेले आहे.

डी मर्जर प्रक्रियेअंतर्गत रिलायन्सच्या भागधारकांना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक अतिरिक्त शेअर मिळाला. समजा तुमच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचा एक शेअर असेल, तर आपोआप जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा एक शेअर तुमच्या डिमॅटमध्ये जमा झाला.

हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे जेव्हा अलीकडे Jio Financial Services ला FTSE ऑल-वर्ल्ड इंडेक्स, FTSE MPF ऑल-वर्ल्ड इंडेक्स, FTSE ग्लोबल लार्ज कॅप इंडेक्स आणि FTSE इमर्जिंग इंडेक्समधून वगळण्यात आले आहे.

ग्लोबल इंडेक्स एग्रीगेटर FTSE ने असा युक्तिवाद केला की Jio Financial Services ने 20 व्यावसायिक दिवसांनंतर व्यापार सुरू केला नाही आणि कोणतीही फर्म सूचीची तारीख जाहीर केली नाही. अशा स्थितीत कंपनीला निर्देशांकातून वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT