jupiter wagons share surges 5 percent after get 1617 crore rupees order from indian railway  Sakal
Share Market

Multibagger Stock: ज्युपिटर वॅगनला मिळाली 1,617 कोटींची मोठी ऑर्डर, शेअरमध्ये दमदार तेजी

Multibagger Stock: 6 सप्टेंबरला या रेल्वे स्टॉकने विक्रमी उच्चांक गाठला होता.

राहुल शेळके

Multibagger Stock: रेल्वे स्टॉक्समध्ये जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळत आहे. नुकतीच ज्युपिटर वॅगनला (Jupiter Wago) 1617 कोटीची तगडी ऑर्डर मिळाली आहे. गुरुवारी शेअर बाजाराला ही बातमी दिल्यानंतर त्यात 5 टक्के अप्पर सर्किट लागले आणि शेअर 330.6 रुपयांवर पोहोचला.

शेवटी तो 4.33 टक्क्यांच्या वाढीसह 328.5 रुपयांवर बंद झाला. ज्युपिटर वॅगन ही इंटिग्रेटेड रेल्वे इंजिनिअरिंग कंपनी आहे, जी प्रामुख्याने मालगाडी वॅगन तयार करते. याशिवाय, कंपनी ब्रेकिंग सिस्टम आणि मरीन कंटेनरमध्येही काम करते. ही कंपनी 2006 मध्ये स्थापन झाली. त्याची वार्षिक क्षमता 8000 वॅगन तयार करण्याची आहे.

ज्युपिटर वॅगनला 4000 BOXNS वॅगन तयार करण्यासाठी 1617 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून हा आदेश प्राप्त झाला आहे. कंपनीला ही ऑर्डर किती कालावधीत पूर्ण करायची आहे, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीची ऑर्डर बुक 5952.65 कोटी आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 2068 कोटी होता. त्याआधारे हे ऑर्डर बुक हेल्दी आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीने महसुलात 111% वार्षिक वाढ आणि नफ्यात 229% वाढ नोंदवली.

गुरुवारी हा शेअर 328 रुपयांवर बंद झाला. त्यांचा 52 आठवड्यांचा उच्चांक 411 रुपये आहे जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. 6 सप्टेंबरला या रेल्वे स्टॉकने विक्रमी उच्चांक गाठला होता. मल्टीबॅगर शेअरने या वर्षी आतापर्यंत सुमारे 260 टक्के आणि एका वर्षात सुमारे 270 टक्के परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT