Real estate Companies sakal
Share Market

Real estate Companies : शेअर बाजारात आणखी एका रिअल इस्टेट कंपनीची एंट्री ? 1,590 कोटी जमवण्याची योजना

आणखी एक रिअल इस्टेट कंपनी शेअर बाजारात उतरणार आहे. कल्पतरूने (Kalpataru) बाजार नियामक सेबीकडे आयपीओ लाँच करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. कल्पतरूच्या आयपीओची साईज 1,590 कोटी असेल. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सचा असेल आणि कंपनीचे प्रमोटर त्यात त्यांचा कोणताही हिस्सा विकणार नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

आणखी एक रिअल इस्टेट कंपनी शेअर बाजारात उतरणार आहे. कल्पतरूने (Kalpataru) बाजार नियामक सेबीकडे आयपीओ लाँच करण्यासाठी अर्ज सादर केला आहे. कल्पतरूच्या आयपीओची साईज 1,590 कोटी असेल. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सचा असेल आणि कंपनीचे प्रमोटर त्यात त्यांचा कोणताही हिस्सा विकणार नाहीत. याचा अर्थ आयपीओमधून येणारे सर्व पैसे कंपनीच्या खात्यात जातील. याशिवाय कंपनी फायनल डॉक्यूमेंट्स सादर करण्यापूर्वी प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे 318 कोटी उभारण्याची तयारी करत आहे. या प्री-आयपीओ प्लेसमेंटनंतर, आयपओची साईज कमी केली जाऊ शकते.

आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी 1,192.5 कोटी कर्ज फेडण्यासाठी वापरतील. उर्वरित रक्कम इतर सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. जून तिमाहीअखेर कंपनीचे एकूण कर्ज 10,747.69 कोटी होते. मोफ्तराज पी मुनोत आणि पराग एम मुनोत हे या कंपनीचे प्रमोटर्स आहेत.

ही कंपनी 1969 मध्ये सुरू झालेल्या कल्पतरू ग्रुपचा एक भाग आहे. कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल, प्रॉपर्टी सोल्युशन्स (इंडिया) आणि श्री शुभम लॉजिस्टिक या ग्रुपमधील इतर कंपन्या आहेत.

ही रिअल इस्टेट कंपनी सध्या तोट्यात चालली आहे. कल्पतरूने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 113.8 कोटीचा निव्वळ तोटा नोंदवला आहे, जो मागील आर्थिक वर्षातील 226.8 कोटीच्या तोट्यापेक्षा कमी आहे. मात्र, त्याच्या महसुलात चढ-उतार होत आहेत. आर्थिक वर्ष 2024 मध्ये त्याचा महसूल 47 टक्क्यांनी घसरून 1,930 कोटी झाला, जो मागील आर्थिक वर्षात 3,633.2 कोटी होता.

कल्पतरू ओबेरॉय रियल्टी, मॅक्रोटेक डेव्हलपर्स, गोदरेज प्रॉपर्टीज, सनटेक रियल्टी, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स, कीस्टोन रिअल्टर्स आणि प्रेस्टिज इस्टेट्स यांच्या प्रोजेक्ट्सशी त्यांची स्पर्धा आहे. कंपनीचे सुमारे 4.98 कोटी स्क्वेअर फिटचा डेव्हलपमेंट एरीया आहे, ज्यामध्ये 40 प्रोजेक्ट्स सुरू आहेत किंवा नियोजित आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT