Kirloskar Oil Engines power generator manufacturers share price share market sakal
Share Market

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही पुणेस्थित कंपनी इंटर्नल कंबशन इंजिननिर्मितीत अग्रेसर

सकाळ वृत्तसेवा

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही पुणेस्थित कंपनी इंटर्नल कंबशन इंजिननिर्मितीत अग्रेसर

- ऋत्विक जाधव

किर्लोस्कर ऑइल इंजिन्स ही पुणेस्थित कंपनी इंटर्नल कंबशन इंजिननिर्मितीत अग्रेसर आहे. कंपनी डिझेल इंजिन, डिझेल जनरेटर सेट्स, इंजिन बेअरिंग्ज आणि इंजिन व्हॉल्व्हचे उत्पादन करते. ही कंपनी जगातील मोठ्या पॉवर जनरेटर उत्पादकांपैकी एक आहे.

कंपनीचे बाजारमूल्य ४६१२३५.८८ लाख रुपये आहे. ग्राहकांच्या मागणी व गरजेनुसार दर्जेदार उत्पादने दाखल करणाऱ्या या कंपनीचे नावीन्य हे वैशिष्ट्य असून, संशोधन हा त्यांचा पाया आहे. औद्योगिक इंजिन क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर ग्राहकांच्या गरजेनुसार २० ते ७५० एचपी क्षमतेच्या उत्पादनांची आवश्यकता असते. त्याची पूर्तता ही कंपनी करते. ही

कंपनी सहा क्षेत्रांमध्ये ८५ हून अधिक औद्योगिक उपक्रमांना ऊर्जा देणारी विविध दर्जेदार डिझेल इंजिन तयार करते. कंपनी गुणवत्तेवर विशेष भर देते. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक उत्पादनेदेखील तिचे वैशिष्ट्य आहे.

पर्यावरणाचा विचार करून कंपनीने उत्सर्जन कमी करणाऱ्या इंजिननिर्मितीवर लक्ष केंद्रीत केले असून, उत्सर्जनविषयक ‘बीएस फोर’ नियमांचे पालन केले जाते. अग्निशामक पंप, शेतीसाठी व मोठ्या बांधकामासाठी लागणारी इंजिनदेखील कंपनी बनवते.

पिढ्यानपिढ्या चालत असलेला व्यवसाय आणि ग्राहकांचे समाधान करणारी सर्वोत्तम उत्पादने आणि भक्कम मूलभूत तत्त्वे असणारी ही कंपनी गुंतवणूक करण्यासाठी एक योग्य पर्याय ठरू शकते.

शेअरचा इतिहास

डिसेंबर २०१० मध्ये २११ रुपयांवर नोंदणी झालेल्या या शेअरने आजपर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. नोंदणी झाल्यापासून सुमारे ५१ टक्के परतावा दिला आहे. तांत्रिक चार्टवर, हा शेअर सुरुवातीच्या दिवसांपासून ३५०-४०० च्या पातळीच्या वर जाण्यासाठी संघर्ष करत होता. २०१८ मध्ये त्याने ४५० रुपयांची उच्चतम पातळी गाठली.

वर्ष २०१८ ते २०२० पर्यंत हा शेअर मंदीचाच कल दाखवत होता. आता तो तेजीचा कल दर्शवित आहे. तांत्रिकदृष्ट्या, चार्टवर मजबूत सकारात्मक संकेत देणारा हा शेअर आगामी दिवसांमध्ये तेजी दर्शवतो.

तांत्रिक आधार

या विशिष्ट स्टॉकचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन जून २०२० पासून मजबूत अपट्रेंडमध्ये होता आणि सुमारे १९० टक्के वाढला. अलीकडे स्टॉक कन्सॉलिडेशनमध्ये आहे आणि मोठ्या ब्रेकआउटसाठी तयार आहे.

या प्रकारच्या चार्ट पॅटर्न मध्ये जिथे मजबूत व्हॉल्यूमसह एक मोठी तेजी दिसते ज्यामुळे फ्लॅग पोल तयार होतो आणि त्यानंतर कमी व्हॉल्यूमसह कन्सॉलिडेशनमुळे फ्लॅग पॅटर्न तयार होते. वरील दोन्ही गोष्टी अप फ्लॅग पॅटर्नसाठी एक आदर्श चार्ट पॅटर्न बनवतात;ज्यामध्ये तेजीचे मोठे संकेत दिसत आहेत.

त्यामुळे ३१७ रुपये या त्याच्या सध्याच्या बाजारभावापासून २८० रुपयांपर्यंतच्या टप्प्यात याची खरेदी करणे योग्य ठरेल. तर ३४० रुपयांच्या पातळीवर आक्रमकपणे खरेदी केली पाहिजे, साप्ताहिक क्लोजिंग आधारावर २६० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवा. येत्या काही आठवड्यांमध्ये या शेअरमध्ये मोठी तेजी दिसण्याची शक्यता आहे.

मध्यम मुदतीत लक्ष्य ५३० रुपये असून, ते तांत्रिक पॅटर्नवर आधारित आहे. मध्यम-मुदतीच्या लक्ष्यासह, रिस्क टू रिवॉर्ड रेशो १ः४ आहे. अल्प जोखीम घेऊन मोठे उद्दीष्ट गाठण्यासाठी हा शेअर एक परिपूर्ण गुंतवणूक पर्याय आहे. नजीकच्या भविष्यात यात ६८ टक्क्यांच्या आसपास किमान नफा अपेक्षित आहे.

शेअरचे नाव ः किर्लोस्कर ऑइल इंजिन्स

  • शिफारस : खरेदी

  • सध्याचा भाव : ३१७ रु.

  • स्टॉपलॉस : २६० रु.

  • लक्ष्य : ५३०

  • कालावधी ः सहा महिने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kabaddi Player Murder : कब्बडीपटूची भरदिवसा हत्या! पोलिसांकडून आरोपीचं एन्काउंटर अन् एकास अटकही

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

Ravi Kishan Death Threat : ‘’चार दिवसांत बिहारला आलात की …’’ म्हणत, रवी किशन यांना जीवे मारण्याची धमकी!

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Shirur Accident : आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक; दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT