KNR Constructions Shares esakal
Share Market

KNR Constructions Shares : या कंस्ट्रक्शन कंपनीच्या शेअरमध्ये तेजीचे संकेत, तुमच्याकडे आहेत का?

केएनआर कन्स्ट्रक्शन्समध्ये शेअर मार्केट एक्सपर्ट्सना तेजीचा कल दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

KNR Constructions Shares : कंस्ट्रक्शन सेक्टरमधील केएनआर कन्स्ट्रक्शन्सच्या (KNR Constructions) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कधीही निराश केलेले नाही. सध्या हे शेअर्स दबावाखाली दिसत असले तरी त्यांनी अवघ्या 14 वर्षांत त्यांच्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

यापुढे केएनआर कन्स्ट्रक्शन्समध्ये शेअर मार्केट एक्सपर्ट्सना तेजीचा कल दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते हा शेअर 335 रुपयांवर पोहोचू शकतो, जो सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 36% वर आहे. केएनआरचा शेअर सध्या 247.20 रुपयांवर आहे.

डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा महसूल चांगला होता. तर स्वतंत्र महसूल वार्षिक 8 टक्क्यांनी वाढून 830 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पण ऍडजस्टेड नेट प्रॉफिट याच कालावधीत 50 टक्क्यांनी घसरून 51 कोटी रुपयांवर आला. व्याज खर्चाचाही कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला.

केरळमध्ये लांबलेल्या मान्सूनचा डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीच्या व्यवसायावर परिणाम झाला. पण, कंपनीची मजबूत क्षमता आणि बॅलेन्सशीटमुळे कंपनीवर विश्वास असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने 316 रुपयांच्या टारगेटसह या कंपनीला बाय रेटिंग दिले आहे. ऍक्सिस डायरेक्टने यासाठी 310 रुपयांचे टारगेट दिले आहे आणि आयसीआयसीआय डायरेक्टने 305 रुपयांचे टारगेट दिले आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने 335 रुपयांचे टारगेट निश्चित केले आहे.

28 नोव्हेंबर 2008 रोजी केएनआर कन्स्ट्रक्शन्सचे शेअर्स फक्त 2.13 रुपयांवर होते. आता त्याची किंमत 247.20 रुपये आहे, म्हणजेच 14 वर्षांत गुंतवणूकदारांचे 1 लाख 11,475 टक्क्यांनी वाढून 1.16 कोटीवर पोहोचले आहेत. तर 4 एप्रिल 2022 रोजी ते 297.35 रुपयांच्या एका वर्षाच्या उच्चांकावर होते. पण पुढील आठ महिन्यांतच तो 32 टक्क्यांनी घसरून 202.85 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आला. यावरुन आता किंमत 22 टक्के रिकव्हर झाली आहे, पण यात मोठी तेजी येण्याची चिन्हे शेअर मार्केट एक्सपर्ट्सना वाटत आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

नवरात्रीच्या उत्सवाला गालबोट! देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरून निघाल्या, वाटेतच टँकरने उडवलं; ४ वर्षीय चिमुकलीसह मायलेकीचा दुर्दैवी अंत

OnePlus 16 स्मार्टफोन होणार लाँच! 9000mAh बॅटरीसह 185FPS गेमिंग सपोर्ट; जाणून घ्या दमदार फीचर्स...

SCROLL FOR NEXT