Kross files draft papers with Sebi to raise Rs 500 crore via IPO  Sakal
Share Market

IPO News: कमाईची संधी! क्रॉस लिमिटेडचा आयपीओ लवकरच येणार; सेबीकडे पेपर्स सादर

Kross IPO: कंपनीने आयपीओद्वारे सुमारे 500 कोटी उभारण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

राहुल शेळके

Kross IPO: व्हेहिकल पार्ट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी क्रॉस लिमिटेडने (Kross Ltd) इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओद्वारे सुमारे 500 कोटी उभारण्यासाठी सेबीकडे प्राथमिक कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनीच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, जमशेदपूर-आधारित कंपनीच्या आयपीओमध्ये 250 कोटींपर्यंतचे शेअर्स आणि प्रमोटर्सकडून 250 कोटीपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. नुकतीच याबाबत डीआरएचपी दाखल करण्यात आली.

ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रमोटर सुधीर राय 168 कोटीपर्यंतचे शेअर्स विकतील आणि अनिता राय 82 कोटीपर्यंतचे शेअर्स विकतील. कंपनी आयपीओपूर्वी 50 कोटीपर्यंतच्या शेअर्सची प्रायव्हेट प्लेसमेंट करू शकते. असे झाल्यास इश्यूचा आकार कमी होईल.

क्रॉसची स्थापना 1991 मध्ये झाली, जी ट्रेलर एक्सल आणि सस्पेंशन असेंब्लीचे उत्पादन आणि पुरवठा करण्यावर लक्ष केंद्रित करते. मीडियम आणि हेव्ही कमर्शियल व्हेहिकल्स आणि फार्म इक्विपमेंट सेगमेंट्ससाठी फॉर्ज बनवते. अशोक लेलँड आणि टाटा इंटरनॅशनल डीएलटी प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे ग्राहक आहेत.

कंपनीचा आर्थिक वर्ष 2023 पर्यंत महसूल 31 कोटी रुपयांच्या पीएटीसह 489 कोटी होता. इक्विरस कॅपिटल ही या इश्यूची बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. बीएसई आणि एनएसईवर इक्विटी शेअर्स लिस्ट करण्याचाही प्रस्ताव आहे. आयपीओतून मिळणाऱ्या पैशांचा वापर यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी, कर्जाची परतफेड आणि कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाईल.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT