Stock News Sakal
Share Market

Stock News: 'या' ब्लू चिप इंजिनीअरिंग स्टॉकचा नवा रेकॉर्ड, काय आहे कारण?

Stock News: लार्सन अँड टुब्रो ही देशातील आघाडीची इंजीनिअरिंग कंपनी आहे. त्यांचा 50 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे आणि तो प्रामुख्याने इपीसी म्हणजेच इंजीनिअरिंग, प्रोक्योअरमेंट आणि कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे.

राहुल शेळके

Stock News: लार्सन अँड टुब्रो ही देशातील आघाडीची इंजीनिअरिंग कंपनी आहे. त्यांचा 50 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय आहे आणि तो प्रामुख्याने इपीसी म्हणजेच इंजीनिअरिंग, प्रोक्योअरमेंट आणि कंस्ट्रक्शन बिझनेसमध्ये आहे.

या कंपनीला सौदी अरेबियातून हजारो कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरमुळे शेअर्समध्ये दीड टक्क्यांहून अधिक वाढ झाली. शिवाय त्याने 3,549 रुपयांचा नवा सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. हा शेअर चार ट्रेडिंग सत्रांपासून सतत वाढत आहे.

बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, लार्सन अँड टुब्रो कन्स्ट्रक्शनला सौदी अरेबियाकडून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डरची साइज 5000-10000 कोटी आहे. हा प्रोजेक्ट सौदी अरेबियाच्या लाल सागर प्रदेशात आहे.

अमाला (AMAALA) असे या प्रोजेक्ट नाव आहे. हा एक अल्ट्रा लक्झरी मेगा प्रोजेक्ट आहे जो सौदी व्हिजन 2030 अंतर्गत येतो. हा प्रोजेक्ट 4155 किमी परिसरात पसरलेला आहे.

या प्रोजेक्टअंतर्गत अतिश्रीमंत लोकांसाठी अल्ट्रा प्रीमियम शैलीत शहर बांधले जात आहे. या अंतर्गत स्थानिक संस्कृतीसह डायव्हर्स नॅचरल इकोसिस्टम विकसित करण्यात येणार आहे. इथे 25 आलिशान हॉटेल्स बांधण्यात येणार आहेत. याशिवाय 900 हून अधिक लक्झरी निवासी व्हिला आणि अपार्टमेंट्स असतील. त्याला स्वप्नांचे शहर म्हटले जाते आहे.

कंपनीची ऑर्डर बुक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 4507 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4.57 लाख कोटीची आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या ऑर्डरमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण ऑर्डर देशांतर्गत 2914 अब्ज आहेत. या स्टॉकने 2023 मध्ये 70 टक्के परतावा दिला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT