lic share price first time above 1000 rupee m cap crosses rupees 6 lakh crore Sakal
Share Market

LIC Share: LICच्या शेअरने प्रथमच पार केला 1,000 टप्पा, मार्केट कॅप 6 लाख कोटींच्यावर; काय आहे तेजीचे कारण?

LIC stock achieves Rs 1,000 milestone; hits an all-time high on BSE: देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी LIC च्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ होत आहे. पहिल्यांदाच एलआयसीच्या शेअर्सने 1000 रुपयांची पातळी ओलांडली आहे.

राहुल शेळके

LIC Share Price: देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी LICच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ होत आहे. पहिल्यांदाच एलआयसीच्या शेअर्सने 1,000 रुपयांची पातळी ओलांडली आहे आणि एलआयसीचे मार्केट कॅप 6 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

सध्या शेअरची किंमत बीएसईवर 6.58 टक्के वाढीसह 1006.85 रुपये आहे. इंट्रा-डेमध्ये शेअरने 1027.05 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

एलआयसीचे मार्केट कॅप 6,36,832.39 कोटी रुपये आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी, मे 2022 मध्ये, शेअर्स 949 रुपये किंमतीला जारी करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअर 45 रुपयांच्या सवलतीत मिळाला, तर पॉलिसीधारकांना तो 60 रुपयांच्या सवलतीत मिळाला.

LIC ही देशातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी

शेअर्सच्या वाढीमुळे एलआयसी जानेवारीमध्येच मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी बनली होती. आत्तापर्यंत, SBI चे मार्केट कॅप 5.79 लाख कोटी रुपये आहे आणि LIC चे मार्केट कॅप 6.37 लाख कोटी रुपये आहे. एसबीआयच्या शेअर्समध्ये आज घसरण होत आहे.

एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी का आहे?

LIC चे शेअर्स गेल्या वर्षी 29 मार्च 2023 रोजी 530.20 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, 11 महिन्यांत शेअर जवळपास 94 टक्क्यांनी वाढून 1,027.05 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

आता शेअर्सच्या अलीकडच्या वाढीबद्दल बोलतांना, ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा असा विश्वास आहे की, एलआयसीने 29 नोव्हेंबर रोजी जीवन उत्सव योजना लाँच केल्यामुळे शेअरमध्ये वाढ झाली आहे.

एलआयसीने नुकतेच जाहीर केले होते की, ते येत्या काही महिन्यांत आणखी तीन ते चार योजना लाँच करणार आहेत जेणेकरून नवीन व्यवसाय प्रीमियमची वाढ दुहेरी अंकांमध्ये होईल.

याशिवाय आरबीआयने एचडीएफसी बँकेतील आपली भागीदारी 9.99 टक्के वाढवण्यास मान्यता दिली आहे. सध्या बँकेत 5.19 टक्के हिस्सा आहे. ब्रोकरेज फर्मने आपले खरेदी रेटिंग 1040 रुपयांच्या लक्ष्य किंमतीवर कायम ठेवले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Women’s World Cup 2025 Ind vs Pak : आज भारत-पाकिस्तान आमनेसामने, महिला खेळाडू हस्तांदोलन करणार?

MPSC 2025: खुल्या प्रवर्गाने परीक्षा द्यायची नाही का? ‘राज्य कर निरीक्षक’ पदासाठी शून्य जागा; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT