Share Market Sakal
Share Market

Lloyds Metals Share: लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या शेअर्सने दिला 2 वर्षात 950% परतावा, काय आहे कारण?

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी ही लोह आणि पोलाद निर्मिती उद्योगातील एक आघाडीची कंपनी आहे.

शिल्पा गुजर

Lloyds Metals Share: लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीच्या (Lloyds Metals and Energy) शेअर्समध्ये सध्या चांगली तेजी दिसून येत आहे. या नव्या तेजीसह त्यांनी 583.85 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. पण सोमवारी व्यवहाराच्या शेवटी 563.05 रुपयांवर बंद झाला.

हा शेअर सोमवारी एनएसईवर लिस्ट झाला. अशात 2023 मध्ये आतापर्यंत कंपनीचे शेअर्स 137 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीला एनएसईकडून लिस्टिंग आणि ट्रेडिंगसाठी मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी 1 रुपाया फेस व्हॅल्यू असणाऱ्या 504.8 मिलियन इक्विटी शेअर्स लिस्ट केले गेले.

लॉयड्स मेटल्स आणि एनर्जीचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 47 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या 6 महिन्यांत त्याने 100% चा जबरदस्त परतावा दिला आहे.

गेल्या एका वर्षात त्याच्या गुंतवणूकदारांनी 276 टक्के नफा कमावला आहे. इतकेच नाही तर या शेअरने गेल्या दोन वर्षांत तब्बल 950 % परतावा दिला आहे.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड ही लोह आणि पोलाद निर्मिती उद्योगातील एक आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे ऑपरेशन्स संपूर्ण नागपूर, महाराष्ट्रात पसरलेले आहे.

ही महाराष्ट्रातील एकमेव लोहखनिज खाण कंपनी आहे जी 2,70,000 टन डायरेक्ट रिड्यूस आयर्न (DRI) आणि 30 मेगाव्हॅट कॅप्टिव्ह पॉवर प्लांटसह (CPP) दरवर्षी 1 कोटी टन उत्पादन करते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्ड्रिफ सिरप (Batch No. SR-13) चा तात्काळ वापर थांबविण्याचे एफडीएचे आदेश

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT