Lok Sabha Elections 2024 Sakal
Share Market

Lok Sabha Elections 2024: एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजार घसरणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Trading Plan:: सर्व सात टप्पे पूर्ण झाल्यानंतर 1 जून रोजी लोकसभेचा एक्झिट पोल जाहीर केला जाईल. लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे निकाल शनिवारी 1 जून रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून येण्यास सुरुवात होतील.

राहुल शेळके

Lok Sabha Elections 2024: 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि पुढील सरकार कोण स्थापन करणार हे अद्याप ठरलेले नाही. पण लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यांत शेअर बाजाराने बरेच चढ-उतार पाहिले. शेअर बाजारातील अस्थिरतेचे मोजमाप करणारा इंडिया VIX लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या सात टप्प्यांमध्ये बहुतेक वेळा 10 ते 21 च्या दरम्यान राहिला आहे.

लोकसभा 2024 चा एक्झिट पोल कधी जाहीर होतील?

सर्व सात टप्पे पूर्ण झाल्यानंतर 1 जून रोजी लोकसभेचा एक्झिट पोल जाहीर केला जाईल. लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी एक्झिट पोलचे निकाल शनिवारी 1 जून रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून येण्यास सुरुवात होतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

1 जून रोजी एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजारात घसरण होईल का?

एक्झिट पोलपूर्वी बाजारात अस्थिरता निर्माण होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सोमवारी 3 जून रोजी, जेव्हा एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर बाजार उघडतील तेव्हा अजूनही तीव्र चढ-उतार होण्याची शक्यता आहे. मतदानाची टक्केवारी आणि निवडणूक निकाल यांचा थेट संबंध नसला तरी, आतापर्यंतच्या कमी मतदानाच्या टक्केवारीमुळे अनिश्चितता वाढली आहे, जी शेअर बाजारातही दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार कोण बनवणार? लोकसभा निवडणूक 2024 च्या एक्झिट पोलनंतर बाजारात घसरण होईल का? नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांचे सहयोगी, ज्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) म्हणून ओळखले जाते, एकत्रितपणे पुढील सरकार स्थापन करतील का? असे अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत.

बाजार विश्लेषकांनी सांगितले की, बाजाराला आशा आहे की NDA पुढचे सरकार स्थापन करेल. लोकसभा निवडणुकीत विजयाचे अंतर आणि NDA विरुद्ध I.N.D.I.A. युतीला किती जागा मिळतील हा अजूनही चर्चेचा विषय आहे. बाजाराला स्थिर सरकार आणि धोरणातील सातत्य अपेक्षित आहे.

यूबीएस सिक्युरिटीजचे प्रेमल कामदार यांनी त्यांच्या अलीकडील नोटमध्ये लिहिले आहे की, “ओपिनियन पोलच्या आधारे, बाजारांना अपेक्षा आहे की एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल आणि भाजप बहुमत राखण्याची शक्यता आहे."

दुसरीकडे, कामदार म्हणाले, निकाल अनपेक्षित असल्यास, नजीकच्या भविष्यात स्टॉक मार्केटमध्ये अचानक घसरण होऊ शकते, ज्यामुळे स्टॉकचे मूल्यांकन एनडीएपूर्व पातळीपर्यंत घसरेल. शेअर्समध्ये मोठी घसरण गुंतवणूकदारांना स्वस्तात खरेदी करण्याची संधी देऊ शकते, असे ते म्हणाले.

ऐतिहासिकदृष्ट्या, बाजार आणि व्यवसाय नवीन सरकारी धोरणांशी जुळवून घेत असल्याने, निवडणुकीच्या निकालांनंतर बाजारातील कमकुवतपणा मध्यम ते दीर्घ कालावधीत वेगाने सावरतो.

इक्वोनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक आणि संशोधन प्रमुख जी चोक्कलिंगम म्हणाले, “एक्झिट पोलचे निकाल लक्षात घेऊन 3 जून रोजी शेअर बाजार उघडण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही या आठवड्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतो. गुंतवणूकदारांनी आताच मोठी रक्कम गुंतवू नका आणि निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा गुंतवणूक करू शकता.''

तांत्रिक विश्लेषकांचे म्हणणे आहे की, डेली चार्टवर निफ्टी 50 निर्देशांक तेजीत आहे. ते म्हणतात की निफ्टी 50 अजूनही 20 आणि 50 दिवसांच्या साध्या मूव्हिंग (SMA) वर आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक/डेरिव्हेटिव्ह विश्लेषक सुभाष गंगाधरन म्हणाले, “आम्ही निवडणुकीच्या निकालापर्यंत आगामी सत्रांमध्ये आणखी तेजी आणि नवीन उच्चांकाची अपेक्षा करतो, परंतु आम्ही नजीकच्या काळात अस्थिरतेसाठी तयार आहोत. जरी घट झाली तरी 22,908 ते 22,871 च्या आसपास वसुली होण्याची शक्यता आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

Education Director Killed : पलूस हादरलं! शिक्षण संस्थेच्या संचालकाचा निर्घृण खून; मुलाने पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात वडिलांचा मृतदेह पाहिला अन्...

ही मालिका मिळूदे म्हणून बोलले आणि... गुढी पाडव्याला गावाला जाणार आहे विजय बाबर; अभिनेत्रींनी सांगितले खास प्लॅन

Jaykumar Gore: कायदा-नियम बदलू, पण मराठा समाजाचे प्रश्न सोडवू: पालकमंत्री जयकुमार गोरे; मला बाहेरचा म्हणू शकत नाही, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी अन् गारपिटीचे संकट, ७ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील २ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT