Share Market Update
Share Market Update  sakal
Share Market

Share Market Update : एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसकडून 1650% डिव्हिडेंडची घोषणा...

सकाळ वृत्तसेवा

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने (L&T Tech Services) आर्थिक वर्ष 2024 साठी डिव्हिडेंडची घोषणा केली आहे. कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक शेअरवर 33 रुपये फायनल डिव्हिडेंड देईल असे कळत आहे. मार्च तिमाहीच्या कमाईची घोषणा करताना, कंपनीने सांगितले की ती आपल्या गुंतवणूकदारांना 1650 टक्के डिव्हिडेंड देईल. फायनल डिव्हिडेंडची रेकॉर्ड डेट योग्य वेळी ठरवली जाईल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी सुमारे 1 टक्क्यांनी घसरण झाली असून शेअर 5180.95 रुपयांवर बंद झाला.

कंपनीच्या संचालक मंडळाने बैठकीत 1650 टक्के फायनल डिव्हिडेंडची शिफारस केली आहे, म्हणजे 2 रुपये फेस व्हॅल्यूच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 33 रुपयांच्या फायनल डिव्हिडेंडची शिफारस केल्याचे एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसने एका निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्यासाठी आधी कंपनीच्या शेअरहोल्डर्सची मंजुरी आवश्यक असेल. ही मंजुरी मिळाल्यास, कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या दिवसापासून 30 दिवसांच्या आत पेमेंट केले जाईल.

एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेसचा हा डिव्हिडेंड गेल्या 8 वर्षांतील कंपनीचा सर्वात मोठा डिव्हिडेंड आहे. कंपनीने 21 नोव्हेंबर 2016 पासून आतापर्यंत 16 वेळा डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनीने गेल्या 12 महिन्यांत प्रति शेअर 47 रुपयांचा डिव्हिडेंडही जाहीर केला आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीवर कंपनीचे डिव्हिडेंड यील्ड 0.91 टक्के आहे. यापूर्वी 2022 मध्ये कंपनीने एकूण 40 रुपये डिव्हिडेंड जारी केला होता. गेल्या वर्षी, कंपनीने जुलैमध्ये 30 रुपये आणि ऑक्टोबर 2022 मध्ये 15 रुपये डिव्हिडेंड जारी केला होता. यानंतर, ऑक्टोबर 2023 मध्ये प्रति शेअर 17 रुपये डिव्हिडेंड दिला गेला.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT