Marico share price Sakal
Share Market

Bangladesh Crisis: बांगलादेशच्या राजकीय संकटाची झळ भारतालाही; गुंतवणूकदार विकत आहेत 'या' कंपनीचे शेअर्स

Marico share price: ठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, एफएमसीजी कंपनी मॅरिको लिमिटेडच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आणि किंमत 642 रुपयांपर्यंत पोहोचली. 30 जुलै 2024 रोजी हा शेअर 690.95 च्या पातळीवर होता.

राहुल शेळके

Marico share price: बांगलादेशात सुरू असलेल्या राजकीय संकटाचा परिणाम भारतीय कंपन्यांच्या शेअर्सवरही झाला आहे. यापैकी एक शेअर मॅरिको लिमिटेड आहे. मंगळवारी, आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, एफएमसीजी कंपनी मॅरिको लिमिटेडच्या शेअर्समध्ये 4% पेक्षा जास्त घसरण झाली आणि किंमत 642 रुपयांपर्यंत पोहोचली. 30 जुलै 2024 रोजी हा शेअर 690.95 च्या पातळीवर होता.

मॅरिको कंपनीचे शेअर्स का कोसळत आहेत?

मॅरिकोच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या उत्पन्नाचा मोठा भाग बांगलादेशातून येतो. कंपनीच्या एकूण उत्पन्नात या देशाचा वाटा एक चतुर्थांश आहे. मॅरिकोच्या उत्पन्नापैकी सुमारे 12% टक्के भाग हा बांगलादेशच्या बाजारातून येतो. मॅरिको बांगलादेशातील 5 पैकी 4 घरांपर्यंत पोहोचल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मॅरिको कंपनीचा आर्थिक वर्ष 2022 च्या अखेरीस बांगलादेशमधून 51% आंतरराष्ट्रीय महसूल आला होता. आर्थिक वर्ष 2027च्या अखेरीस 40% पर्यंत कमी करण्याचा त्यांचा मानस आहे. वितरण आणि मागणी सुधारण्यासाठी पुढील तीन वर्षांत 80 कोटी ते 100 कोटी खर्च करण्याची कंपनीची योजना आहे.

जून तिमाहीचे निकाल कसे होते?

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मॅरिको लिमिटेडचा नफा 8.71 टक्क्यांनी वाढून 474 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 436 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 6.7 टक्क्यांनी वाढून रु. 2,643 कोटी झाले आहे, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत रु. 2,477 कोटी होते.

सॅफोला, पॅराशूट आणि लिव्हॉन सारख्या लोकप्रिय ब्रँडची मालकी असलेल्या मॅरिकोच्या एकूण मार्जिनमध्ये 2.3 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, त्याचा एकूण खर्च 6.08 टक्क्यांनी वाढून 2,075 कोटी रुपये झाला आहे.

भारताचा शेजारी बांगलादेश सध्या राजकीय संकटातून जात आहे. आरक्षणावरून झालेल्या गदारोळानंतर जमाव इतका आक्रमक आणि हिंसक झाला की, पंतप्रधान शेख हसीना यांनाही 'सुरक्षित स्थळी' देश सोडून जावे लागले. शेख हसीना पायउतार झाल्या असून आता लष्कर देशात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT