Share Market Sakal
Share Market

Market Capitalization: 'या' 8 कंपन्यांमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले; शेअर मार्केमध्ये...

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे.

राहुल शेळके

Market Capitalization Data: सेन्सेक्समधील आघाडीच्या 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,17,493.78 कोटी रुपयांनी घसरले.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात इन्फोसिसचे सर्वाधिक नुकसान झाले. गेल्या आठवड्यात बीएसईचे शेअर्स सेन्सेक्सवर 775.95 अंकांनी म्हणजेच 1.28 टक्क्यांनी घसरला.

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांचे मोठे नुकसान:

रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर्स घसरणीत आहेत. फक्त ITC आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे बाजार भांडवल वाढले आहे.

इन्फोसिसचे मार्केट कॅप सर्वाधिक घसरले:

गेल्या आठवड्यात इन्फोसिसचे बाजार भांडवल 66,854.05 कोटी रुपयांनी घसरून 5,09,215 कोटी रुपयांवर आले. इन्फोसिसचा चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा अपेक्षेपेक्षा कमी होता.

कंपनीने 13 एप्रिल रोजी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. HDFC बँकेचे बाजारमूल्य 10,880.5 कोटी रुपयांनी घसरून 9,33,937.35 कोटी रुपये झाले.

आयसीआयसीआय बँकेसह एचयूएल आणि एचडीएफसीचे मार्केट कॅप घसरले:

ICICI बँकेचे मार्केट कॅप 10,462.77 कोटी रुपयांनी घसरून 6,17,477.46 कोटी रुपये झाले. TCS चे बाजारमूल्य 10,318.52 कोटी रुपयांनी घसरून 11,56,863.98 कोटी रुपये झाले.

हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) चे बाजारमूल्य 8,458.53 कोटी रुपयांनी घसरून 5,86,927.90 कोटी रुपयांवर आले. HDFC चे मार्केट कॅप 5,172.27 कोटी रुपयांच्या तो घसरणीसह 5,06,264.24 कोटींवर आले.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे नुकसान:

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 4,566.52 कोटी रुपयांनी घसरून 15,89,169.49 कोटी रुपये आणि भारती एअरटेलचे मार्केट कॅप 780.62 कोटी रुपयांनी घसरून 4,26,635.46 कोटी रुपये झाले.

या दोन शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना फायदा झाला:

ITC चे बाजार भांडवल रु. 15,907.86 कोटींनी वाढून रु. 5,07,373.82 कोटी झाले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मूल्यांकन 8,746.11 कोटी रुपयांनी वाढून 4,84,561.80 कोटी रुपये झाले.

रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम ठेवले आहे:

सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यानंतर अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, एचडीएफसी, एसबीआय आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT