Maruti Suzuki Share Sakal
Share Market

Maruti Suzuki Share: मारुती सुझुकीने शेअर बाजारात केला विक्रम, पहिल्यांदाच शेअरची किंमत भिडली गगनाला

Maruti Suzuki Share: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे.

राहुल शेळके

Maruti Suzuki Share: देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीच्या नावावर नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. मारुती सुझुकीच्या शेअर्सनी आज गुरुवारच्या व्यवसायात त्यांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला आणि यासोबतच शेअरने प्रथमच 10,000 रुपयांचा टप्पा ओलांडला.

एका शेअरची किंमत किती?

गुरुवारी दुपारी 2 वाजता मारुती सुझुकीचा शेअर बीएसईवर 2.50 टक्क्यांहून अधिक वाढीसह 10,050 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता. दिवसाच्या व्यवहाराच्या एका टप्प्यावर, मारुती सुझुकीच्या शेअरने रु. 10,062.15 ची पातळी गाठली.

मारुती सुझुकीच्या शेअर 52 आठवड्यांचा उच्चांक आहे. इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा या ऑटो कंपनीचा स्टॉक 10,000 रुपयांच्या पुढे गेला आहे.

कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या तेजीचा फायदा गुंतवणूकदारांनाही झाला. एका दिवसात मारुती सुझुकीच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

त्याच वेळी, कंपनीचे मार्केट कॅप आता 3.04 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मारुती सुझुकीचे बाजार भांडवलही आज पहिल्यांदाच 3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने एक मोठी घोषणा केली होती. मारुती सुझुकी येत्या 8 वर्षात मोठी गुंतवणूक करणार आहे. कंपनीने पुढील 8 वर्षांत 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते.

मारुती सुझुकी इंडियाची वार्षिक उत्पादन क्षमता 8 वर्षांत 40 लाख युनिट्सपर्यंत दुप्पट करण्यासाठी सुमारे 45,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. कंपनीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी ही माहिती दिली.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT