Multibagger Stock: माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या (Mazagon Dock Stock) शेअर्सनी 2023 मध्ये त्यांच्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत त्यांचा शेअर सुमारे 190% वाढला आहे. त्या तुलनेत बेंचमार्क निफ्टी या काळात केवळ 20% वाढला आहे.
गेल्या 5 वर्षात माझगाव डॉकने 1,259.12% परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख गुंतवले असते, तर आज त्याचे 13.5 लाख झाले असते. सध्या हे शेअर्स 2,284 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
कंपनीचे मार्केट कॅप सध्या 46,074 कोटी आहे. मार्केट कॅपच्या दृष्टीने ही देशातील सर्वात मोठी शिपयार्ड कंपनी आहे. त्याचे शेअर्स सध्या त्यांच्या 52-आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा फक्त 8% खाली आहेत.
स्टॉक त्याच्या 52 आठवड्यांच्या नीचांकी वरून 273.27 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या स्टॉकवर आपले 'बाय' रेटिंग कायम ठेवत स्टॉकला 2,774 रुपयांचे टारगेट दिले आहे.
टेक्निकल चार्टचा विचार केल्यास कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येते. आर्थिक आघाडीवर कंपनीची कामगिरीही चांगली आहे. गेल्या 3 वर्षात महसूल वार्षिक 15.9% दराने वाढला आहे. तर निव्वळ नफ्यात 33.5% वाढ झाली आहे.
माझगाव डॉक शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्ये अजूनही तेजी असल्याचे अँटिक स्टॉक ब्रोकिंगने ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले होते. कंपनीच्या क्षमतेचा वापर वाढत असल्याचे ब्रोकरेज सांगत आहेत.
सबमरीनसह गैर सबमरीन कामांसाठी सुमारे 1.3 लाख कोटी रुपयांची बाजारपेठ आहे आणि कंपनीकडे सतत नवीन ऑर्डर मिळवण्याची क्षमता आहे. ब्रोकरेजने आर्थिक वर्ष 2023 ते 2026 या काळात त्यांचा महसूल आणि निव्वळ नफा अनुक्रमे 21% आणि 22% ने वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.