Shipping Corporation of India
Shipping Corporation of India sakal
Share Market

Shipping Corporation of India : डिमर्जर प्लानच्या मान्यतेनंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ

सकाळ डिजिटल टीम

Shipping Corporation of India : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SCI) शेअर्समध्ये सध्या 12 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत आहे आणि इंट्रा-डे त्याची किंमत 129 रुपये प्रति शेअरवर पोहोचली. तर एनएसईवर 9.34 टक्क्यांच्या वाढीसह 125.80 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सरकारने कंपनीच्या कोर आणि नॉन-कोअर ऍसेट्सना डिमर्जरची मान्यता दिली. त्यामुळे त्याच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सरकार ही कंपनी विकण्याची तयारी करत आहे. (MCA Approves Demerger Of Core And Non Core Assets Of SCI Shipping Corporation of India shares increased )

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या नॉन-कोअर ऍसेट्सना शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड ऍसेट्स लिमिटेडमध्ये डिमर्जर करण्यास मान्यता दिली आहे असे एससीआयने एका एक्सेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे. सरकार ही कंपनी विकण्याची तयारी करत असून डिइनव्हेस्टमेंटच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.

डिमर्जरनंतर नॉन-कोअर कंपनीची वेगळी लिस्टिंग असेल. डिमर्जरच्या योजनेला SCI बोर्ड, DIPAM, MoPSW, SCILAL बोर्ड आणि स्टॉक एक्स्चेंजकडून मंजुरी मिळाली आहे. डिमर्जर योजना त्याच्या मंजुरीसाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे (MCA) दाखल करण्यात आली होती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT