Mercury Metals Stock  esakal
Share Market

Mercury Metals Stock : 3 वर्षात 1 लाखाचे 43 लाख, या पेनी स्टॉक ठरला मल्टीबॅगर

या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे.

शिल्पा गुजर

Mercury Metals Stock : मल्टीबॅगर स्टॉक्स तुम्हाला कमी कालावधीत प्रचंड परतावा मिळवून देतात. यामुळेच बहुतेक गुंतवणूकदार अशा शेअर्सच्या शोधात असतात. काही पेनी स्टॉक्सही मल्टीबॅगर ठरलेत. पण या शेअर्समध्ये धोका देखील खूप जास्त असतो, पण परतावाही तितकाच छप्परफाड असतो.

जर तुम्ही पेनी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही मर्क्युरी मेटलवर (Mercury Metals) फोकस करु शकता. या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 190% वाढला आहे.

मर्क्युरी मेटल्सच्या शेअर्सने गेल्या एका महिन्यात 10% परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 190 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षी आतापर्यंत त्याचे शेअर्स 25 टक्क्यांनी वाढले आहेत. लाँग टर्ममध्ये या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार नफा दिला आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना 1580 टक्के नफा झाला आहे. त्याच वेळी, गेल्या 3 वर्षांत या स्टॉकमध्ये 4238 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या तीन वर्षांत मर्क्युरी मेटलच्या गुंतवणूकदारांच्या पैशात 43 पट वाढ झाली आहे. एप्रिल 2020 मध्ये, त्याच्या एका शेअरची किंमत फक्त 0.36 रुपये होती. तर आता याची किंमत 15.62 रुपये झाले आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 43 लाख झाले असते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सेवानिवृत्ती वयोगटात बदल, अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे प्रस्ताव

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

SCROLL FOR NEXT