Mukka Proteins gets Sebi's nod to raise funds via initial public offering  Sakal
Share Market

IPO News: फिश प्रोटीन प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीचा लवकरच येणार आयपीओ, सेबीकडून ग्रीन सिग्नल

IPO News: कंपनीने या वर्षी जूनमध्ये आयपीओसाठी नवीन कागदपत्रे सादर केली होती.

राहुल शेळके

IPO News: फिश प्रोटीन प्रॉडक्ट्स उत्पादक कंपनी मुक्का प्रोटीन्सला (Mukka Proteins) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून (सेबी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग अर्थात आयपीओद्वारे निधी उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), फिश मील, फिश ऑइल आणि विरघळणारी फिश पेस्ट बनवणारी कंपनी आयपीओ अंतर्गत 8 कोटी रुपयांपर्यंत फ्रेश इश्यू जारी करेल.

कंपनीने या वर्षी जूनमध्ये आयपीओसाठी नवीन कागदपत्रे सादर केली होती. सेबीकडून आयपीओसाठी ऑब्जर्वेशन लेटर 30 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाले. कंपनी आयपीओमधून मिळालेली 120 कोटींची रक्कम खेळत्या भांडवलाच्या गरजा भागवण्यासाठी वापरेल.

याशिवाय, ती त्याच्या उपकंपनी एंटो प्रोटीन्समध्ये (Ento Proteins)10 कोटीपर्यंत गुंतवणूक करेल. याशिवाय, त्याचा काही भाग सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी खर्च करेल.

आयपीओची साईज 175 कोटी ते 200 कोटीच्या दरम्यान असेल असे सुत्रांकडून समजत आहे. कंपनी तीन ब्लेंडिंग फॅसिलिटी आणि पाच स्टोरेज फॅसिलिटीही चालवते.

देशांतर्गत बाजारपेठेव्यतिरिक्त, ते बहरीन, चिली, मलेशिया, फिलीपिन्स, चीन, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, ओमान, तैवान आणि व्हिएतनामसह 10 हून अधिक देशांमध्ये उत्पादनांची निर्यात करते. फेडेक्स सिक्युरिटीज या इश्यूसाठी मर्चंट बँकर आहे, तर कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस ऑफरचे रजिस्ट्रार आहेत.

मुक्का प्रोटीन्सचा ऑपरेशनल रेव्हेन्यू 27.60% ने वाढून आर्थिक वर्ष 2022 मध्ये 770.50 कोटी झाला आहे, जो आर्थिक वर्ष 2021 मध्ये 603.83 कोटी होता आणि प्रॉफिट आफ्टर टॅक्स 134.50% ने वाढून 25.82 कोटी झाला आहे जो मागील आर्थिक वर्षात 11.01 कोटी होता.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT