Multibagger Stock 30 percent return in one month; KPI Green Energy getting huge orders  Sakal
Share Market

Multibagger Stock: एका महिन्यात 30 टक्के रिटर्न; 'या' पॉवर सेक्टरमधील कंपनीला मिळतायत भरमसाठ ऑर्डर्स

Multibagger Stock: कंपनीचा शेअर 1,130 रुपयांवर आहे

सकाळ डिजिटल टीम

Multibagger Stock: शेअर बाजारात सध्या पॉवर सेक्टरचे शेअर्स जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यातही रिन्यूएबल एनर्जी सेक्टरसाठी काम करणार्‍या कंपन्यांना भरमसाठी ऑर्डर्स मिळत आहेत. या स्टॉक्समध्ये चांगलीच वाढ होत आहे.

सोलर आणि हायब्रीड पॉवर जनरेशन कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीला (KPI Green Energy) आणखी एक ऑर्डर मिळाल्याचे शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत सांगितले आहे. सध्या हा शेअर 1130 रुपयांवर आहे . गेल्या सहा महिन्यांत त्यात 111% चा मजबूत परतावा दिसून आला आहे.

बीएसई वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, केपीआय ग्रीन एनर्जीला 1.75 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नवीन ऑर्डर मिळाली आहे. कंपनीच्या उपकंपनी केपीआयजी एनर्जीया प्रायव्हेट लिमिटेडला ही ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर सेगमेंटशी संबंधित आहे. या ऑर्डरमुळे कंपनीची एकूण ऑर्डर बुक 149 मेगावॅट झाली आहे.

सिटीझन अंब्रेला मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडकडून कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पूर्ण करायची आहे. याआधी डिसेंबर महिन्यात कंपनीला 4.40 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळाली होती.

त्याआधी नोव्हेंबर महिन्यात 24 तारखेला 4.66 मेगावॅट, 10 तारखेला 1.60 मेगावॅट, 7 तारखेला 2.70 मेगावॅट, 3 तारखेला 5.70 मेगावॅट, 2 नोव्हेंबरला 2.10 मेगावॅट आणि 1 नोव्हेंबरला 6.50 मेगावॅटच्या ऑर्डर्स मिळाल्या होत्या.

कंपनीने 2025 पर्यंत 1000 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. सध्या कंपनीचा शेअर 1130 रुपयांवर आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1263 रुपये आहे.

हा शेअर एका महिन्यात 30 टक्के, तीन महिन्यांत 32 टक्के, सहा महिन्यांत 111 टक्के, यावर्षी आतापर्यंत 160 टक्के वाढला आहे आणि एका वर्षात यात 147 टक्के वाढ झाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Latest Marathi News Updates : नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने घेतला पेट

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT