Aurionpro Solutions Sakal
Share Market

Multibagger Stock: 3 वर्षात 10 हजाराचे झाले 5.55 लाख, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का 'हा' शेअर?

Multibagger Stock: ऑरियनप्रो सोल्युशन्स (Aurionpro Solutions) गुंतवणूकदारांसाठी अतिशय फायदेशीर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेअरने लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock: ऑरियनप्रो सोल्युशन्स (Aurionpro Solutions) गुंतवणूकदारांसाठी अतिशय फायदेशीर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. या शेअरने लाँग टर्मच नाही तर शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

या शेअरमधली तेजी आता काही थांबायचे नाव घेणार नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या हा शेअर 2229.05 रुपयांवर ट्रेड करत आहे. सध्याच्या पातळीवर गुंतवणूक करुनही यात चांगला नफा कमावता येऊ शकतो असा विश्वास तज्ज्ञांना वाटत आहे. अशात ब्रोकरेज फर्म व्हेंचुराने पुढील दोन वर्षांसाठी या शेअरला 2887 रुपयांच्या टारगेट आणि बाय रेटिंगसह आपले कव्हरेज सुरू केले आहे.

ऑरियनप्रो सोल्यूशन्सचे शेअर्स 7 मे 2020 रोजी फक्त 40.15 रुपयांना मिळत होते. पण आता तो तब्बल 2229.05 रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच तीन वर्षांत त्याने गुंतवणूकदारांच्या 10 हजारांचे 5.5 लाख केलेत.

आता जर आपण गेल्या एका वर्षातील शेअर्सच्या हालचालीबद्दल बोललो तर, 28 मार्च 2023 रोजी ते 291.00 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, 9 महिन्यांत 683 टक्क्यांहून अधिक तेजीसह 27 डिसेंबर 2023 रोजी 2279.95 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

ऑरियनप्रो सोल्युशन्स ही एक सॉफ्टवेअर प्रॉडक्ट कंपनी आहे ज्याचा फोकस बँकिंग आणि फायनांन्शियल सॉफ्टवेअर तसेच टेक्नॉलॉजी इनोव्हेशन ग्रुपवर (TIG) आहे. त्यांनी सप्टेंबर तिमाहीत 810 कोटीची कंसालिडेटेड ऑर्डर मिळाली आहे. ज्यामुळे मीडियम टर्ममध्ये चांगल्या रेवेन्यूची शक्यता आहे.

कंपनी देशाबाहेरही विस्तारत आहे आणि अमेरिकन बाजारपेठेतही तिचे अस्तित्व आहे. सेल्स, चॅनेल आणि पर्सनल यांच्यातील भरीव गुंतवणुकीसह, कंपनीने मोठ्या बँकांशी संपर्क साधण्याचे आणि आशियातील 50-100% बँकांचे अधिग्रहण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT