Multibagger Stock Birlasoft Share Price 192 percent return in 10 months  Sakal
Share Market

Multibagger Stock: अवघ्या 15 वर्षात एका लाखाचे झाले एक कोटी, 10 महिन्यात 192 टक्के परतावा

Birlasoft Share Price: तज्ज्ञांच्या मते या शेअर्समध्ये कमाईची संधी अजूनही आहे.

राहुल शेळके

Birlasoft Share Price: सीके बिर्ला ग्रुपच्या बिर्लासॉफ्टने (BirlaSoft) गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. अवघ्या 15 वर्षांत 1 लाखाच्या गुंतवणुकीवर त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. याशिवाय केवळ 10 महिन्यांत सुमारे 192 टक्के परतावा दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते यात बंपर कमाईची संधी अजूनही आहे. देशांतर्गत ब्रोकरेज एचडीएफसी सिक्युरिटीजने यावर खरेदीचे रेटिंग कायम ठेवले आहे. सध्या बीएसईवर कंपनीचे शेअर्स 2.66 टक्क्यांच्या वाढीसह 719.10 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

26 डिसेंबर 2008 रोजी बिर्लासॉफ्टचे शेअर्स अवघ्या 7.04 रुपयांवर होते. आता ते 719.10 रुपयांवर आहे, म्हणजे अवघ्या 15 वर्षांत 1 लाखाचे 1 कोटी बनवले. 3 फेब्रुवारी 2023 रोजी तो 250.35 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.

यानंतर, 10 महिन्यांत 192 टक्क्यांनी झेप घेतली आणि 15 डिसेंबर 2023 रोजी 730.90 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. प्रॉफिट बुकींगमुळे सध्या या उच्चांकावरून तो दीड टक्क्यांहून अधिक घसरणीवर आहे.

ब्रोकरेज एचडीएफसी सिक्युरिटीजने बिर्लासॉफ्टवर आपले खरेदी रेटिंग कायम ठेवले आहे. पण टारगेट प्राइस 800 रुपये केली आहे, जी आर्थिक वर्ष 2026 च्या अंदाजे इपीएसच्या 26 पट आहे. अलीकडे, कंपनीने टायर-1 कंपन्यांकडून सीनियर लेव्हलवर नियुक्ती केली आहे, जी कंपनीच्या वाढीसाठी जोर लावू शकते.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bill Gates Confession : मोठी बातमी! ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणी बिल गेट्स यांचा धक्कादायक कबुलनामा

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Kidney Transplant : हलाखीच्या परिस्थितीतही बाप ठरला ‘जीवनदाता’; वडिलांनी दिली मुलाला किडनी

Palghar: पालघरकरांचे हाल! तारापूर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली, विविध आजारांमुळे स्थानिक बेजार

SCROLL FOR NEXT