Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stock: गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला दुप्पट परतावा; कंपनी लवकरच स्टॉक स्प्लिट करणार

गेल्या वर्षी, कंपनीच्या बोर्डाने गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात इक्विटी शेअर्सचा बोनस देण्यास मान्यता दिली होती.

शिल्पा गुजर

Multibagger Stock: आर्किटेक्चरल हार्डवेअर निर्माता हार्डविन इंडिया (Hardwyn India) लवकरच स्टॉक स्प्लिट जाहीर करण्याची शक्यता आहे. 26 एप्रिलला कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत स्टॉक स्प्लिटबाबत निर्णय घेतला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

हार्डविन इंडिया हा मल्टीबॅगर स्टॉक आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. गुरुवारी शेअर्सना 20 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. एनएसईवर हा शेअर 304.80 रुपयांवर बंद झाला.

हार्डविन इंडिया ऍल्युमिनियम प्रोडक्ट्सचे उत्पादन आणि वितरण करते. कंपनी रेसिडेंशियल आणि कमर्शियल स्ट्रक्चरसाठी आर्किटेक्चरल हार्डवेअर, ग्लास फिटिंग्ज, डोअर क्लोजर, लॉक्स आणि संबंधित सोल्युशन्स प्रोव्हाईड करते.

गेल्या वर्षी, कंपनीच्या बोर्डाने गुंतवणूकदारांना 1:2 च्या प्रमाणात इक्विटी शेअर्सचा बोनस देण्यास मान्यता दिली होती. डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेशन्सचा महसूल 34 कोटी होता, तर याच कालावधीत नेट प्रॉफिट 3.26 कोटी होता

हार्डविन इंडियाने गेल्या 5 दिवसात 13% परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत त्याचे शेअर्स 23 टक्क्यांनी वाढले आहेत. मात्र, या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

गेल्या एका वर्षाबद्दल बोलायचे तर, गुंतवणूकदारांना 214 टक्के इतका चांगला परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत फक्त 96 रुपये होती, ती आज 304 रुपये झाली आहे.

स्टॉक स्प्लिट हे साधारणपणे बाजारातील स्टॉकची लिक्विडिटी वाढवण्यासाठी केले जाते. जेव्हा एखाद्या कंपनीचे शेअर्स खूप महाग होतात, तेव्हा लहान गुंतवणूकदार त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाहीत. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या स्टॉक स्प्लिट करतात.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT