Multibagger Stock marathi  Sakal
Share Market

Multibagger Stocks: 90 वर्ष जुन्या कंपनीने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 25 रुपयांच्या शेअरने केले कोट्यधीश

Multibagger Stocks: 24 सप्टेंबर 2002 रोजी कंपनीचे शेअर्स केवळ 25 रुपयांवर होते.

राहुल शेळके

Multibagger Stocks: 90 वर्षे जुनी मुंबईतील इन्व्हेस्टमेंट कंपनी इंडस्ट्रियल अँड प्रुडेंशियल इन्व्हेस्टमेंटच्या (Industrial and Prudential Investment) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

शेअर्समधील तेजी शिवाय डिव्हिडेंड देत त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना सोबत ठेवले आहे. सध्या हा शेअर 2,860.85 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीवर कोणतेही कर्ज नाही, ही मोठी जमेची बाजू आहे.

24 सप्टेंबर 2002 रोजी हे शेअर्स केवळ 25 रुपयांवर होते. आता ते 2860.85 रुपयांवर आहेत, म्हणजेच 21 वर्षात 1 लाखाचे 1.14 कोटी झाले. त्यांनी केवळ लाँग टर्मच नाही शॉर्ट टर्ममध्येही चांगला परतावा दिला आहे.

21 मार्च 2023 रोजी तो 1505.80 रुपयांवर होता. यानंतर शेअर्सची खरेदी वाढली आणि अवघ्या पाच महिन्यांत 14 ऑगस्ट 2023 रोजी तो 96 टक्क्यांनी 2,947.95 रुपयांवर गेला, जो याचा उच्चांक आहे, पण सध्या हा शेअर 3 टक्क्यांच्या सुटीवर मिळत आहे.

इंडस्ट्रियल आणि प्रुडेन्शियल इन्व्हेस्टमेंटने शेअर्सच्या झपाट्याने वाढीमुळे गुंतवणूकदारांना कोट्यधीश तर बनवले आहेच, पण डिव्हिडंडनेही त्यांना चांगली कमाई केली आहे. 2003 पासून, ते दरवर्षी गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड देतात.

2019, 2020 आणि 2021 मध्ये गेल्या पाच वर्षांच्या बाबतीत बोलायचे झाले तर 25-25 रुपये प्रति शेअर डिव्हिडेंड दिला आहे. त्यानंतर 2022 मध्ये प्रति शेअर 50 रुपये डिव्हिडेंड दिला आणि आता या वर्षी 60 रुपये डिव्हिडेंड देणार आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

SCROLL FOR NEXT