Multibagger Stock  Sakal
Share Market

Multibagger Stock: रॉकेटच्या वेगाने धावतोय 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे 3 वर्षात 1 लाखाचे झाले 45 लाख

Multibagger Stock: गुरुवारी शेअर 4 टक्क्यांनी वाढून 700 रुपयांपर्यंत पोहोचला.

राहुल शेळके

Multibagger Stock: गेल्या 3 वर्षात ज्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना शेअर बाजारात सर्वाधिक परतावा दिला आहे त्यापैकी एक म्हणजे 'के अँड आर रेल इंजिनिअरिंग (K and R Rail Engineering) आहे. गुरुवारी या शेअरने ऑल टाईम हाय गाठला आणि 4 टक्क्यांनी वाढून 700 रुपयांपर्यंत पोहोचला.

सुमारे 1,346.31 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपिटलसह ही देशातील प्रमुख रेल्वे कंस्ट्रक्शन कंपन्यांपैकी एक आहे. परताव्याच्या बाबतीत, या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना अतिशय दमदार परतावा दिला आहे.

'के अँड आर रेल इंजिनिअरिंगचे शेअर्स बीएसईवर सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी, 20 मार्च 2020 रोजी केवळ 15.17 रुपयांवर होते. जे आज जवळपास 700 रुपयांपर्यंत वाढले आहे. अशा प्रकारे, गेल्या 3 वर्षांत, त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 4,514.37 टक्के परतावा दिला आहे.

याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराने साडेतीन वर्षांपूर्वी म्हणजे 20 मार्च 2020 रोजी या शेअरमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असेल तर त्याच्या 1 लाखाचे किंमत 4,514.37 टक्क्यांनी वाढली असती आणि आज त्याचे 46 लाख झाले असते.

'के अँड आर रेलच्या शेअर्सची गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 22.04% वाढ झाली आहे. तर केवळ या वर्षाच्या सुरुवातीपासूनच, त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 969.52 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरची किंमत सुमारे 2,413.46% वाढली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT