Multibagger Stock Skipper Limited gave returns of 220 percent in 1 year  Sakal
Share Market

Multibagger Stock: स्किपर लिमिटेडच्या शेअर्सने एका वर्षात दिला 220 टक्के परतावा; गुंतवणूकदार झाले मालामाल

Multibagger Stock: कंपनीचे मार्केट कॅप 2,344 कोटी आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock: स्किपर लिमिटेडच्या (Skipper Limited) शेअर्सने गुंतवणुकदारांना गेल्या 6 महिन्यांत 125% आणि एका वर्षात 220% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांनी या स्मॉल कॅप स्टॉकवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीचा निव्वळ नफा 16 कोटी होता, जो वार्षिक आधारावर 1,700% वाढला आहे. 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 33.41% ची वाढ होऊन 555 कोटी झाली आहे.

या कालावधीत कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट 71.43 टक्क्यांनी वाढून 60 कोटीवर पोहोचला होता. स्किपर लिमिटेडचे मार्केट कॅप 2,344 कोटी आहे.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीची निव्वळ विक्री 16% ने वाढून 1,980 कोटी झाली, तर निव्वळ नफा वार्षिक 44% ने वाढून 36 कोटी झाला. जून 2023 पर्यंत, कंपनीची ऑर्डर बुक 5,372 कोटी आहे. कंपनीच्या एकूण ऑर्डरमध्ये देशांतर्गत विभागाचा वाटा 76 टक्के आहे, तर निर्यातीचा वाटा 24 टक्के आहे.

स्किपर लिमिटेडने पंजाबमधील वाघा-अटारी सीमेवर भारतातील सर्वात उंच ध्वजस्तंभ (flagpole) स्थापित केला आहे. हा स्तंभ 418 फूट (127.5 मीटर) उंच असेल. याचे उद्घाटन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. यात DEMAG AC 1600 1600 मॉडेल क्रेनचा वापर करण्यात आला. तसेच, इन्स्टॉलेशनची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत व्हर्टिकल लिफ्टिंग सिस्टमचा वापर करण्यात आला. हा फ्लॅगपोल 418 फूट अर्थात 127.5 मीटर उंच आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाची एकहाती सत्ता

Pune Nagradhyakhsa : पुण्यात फक्त अजितदादा! १७ पैकी १० नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे, महाविकासआघाडीचा सुपडा साफ

New Year Travel Tips: शिमला-कुल्लु-मनाली? नवीन वर्षात हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर 'या' चुका करु नका

शुभमन गिलसोबत विश्वासघात! T20 World Cup संघातून हाकलल्याचे केव्हा सांगितले? आत्ताची मोठी अपडेट

Latest Marathi News Live Update: २६ नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक

SCROLL FOR NEXT