Multibagger Stock Updates Sakal
Share Market

Multibagger Stock: 'या' शेअरमुळे 20 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्याधीश, आणखी तेजीचे तज्ज्ञांचे संकेत

Multibagger Stock: 8 ऑगस्ट 2013 रोजी हा शेअर 17.74 रुपयांवर होता.

राहुल शेळके , शिल्पा गुजर

Multibagger Stock: सोनाटा सॉफ्टवेअरच्या (Sonata Software) शेअर्सवर सध्या दबाव दिसून येत आहे, नुकतीच यात एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. अमेरिकेच्या रेटींगमधील कपातीमुळे हा दबाव दिसून येत आहे.

आता जरी या शेअर्समध्ये घसरण दिसत असली तरी सोनाटाच्या शेअर्सने लाँग टर्मसह शॉर्ट टर्ममध्येही आपल्या गुंतवणुकदारांना दमदार नफा मिळवून दिला आहे.

गेल्या एका वर्षाचा विचार केल्यास यात दुप्पट परतावा दिला आहे. त्यामुळेच ब्रोकरेजने यामध्ये तेजीचे संकेत दिसत आहे. सध्या हे शेअर्स 1040.90 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

8 ऑगस्ट 2003 रोजी सोनाटाच्या शेअर्स किंमत फक्त 9.57 रुपये होती. आता ती 1040.90 रुपयांवर गेली आहे, म्हणजे 20 वर्षात 1 लाखाचे 1.09 कोटी झाले आहे. त्याच वेळी, याने कमी वेळेतही उत्कृष्ट परतावा दिला आहे.

8 ऑगस्ट 2013 रोजी हा शेअर 17.74 रुपयांवर होता, याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत 5767 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, म्हणजेच 1 लाखाचे 58 लाख रुपये झाले आहेत.

गेल्या वर्षी 30 सप्टेंबर 2022 रोजी तो 487.50 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, सुमारे 10 महिन्यांत 124 टक्क्यांहून अधिक वाढीसह 18 जुलै 2023 रोजी 1094 रुपयांवर पोहोचला. सोनाटा सॉफ्टवेअरच्या शेअर्सचा हा विक्रमी उच्चांक आहे.

सोनाटाची जून तिमाही मजबूत होती. मॅनेजमेंटचा पॉझिटीव्ह ऍप्रोच आणि आता आयटी सर्व्हिसेसचा महसूल आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 50 कोटी डॉलरपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.

मोठ्या डील मिळवण्याचे मोमेंटम पॉझिटीव्ह आहे आणि येत्या तिमाहीत त्यात आणखी भर पडेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ब्रोकरेजने आपले बाय रेटिंग कायम ठेवत यामध्ये गुंतवणुकीसाठी 1170 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT