Multibagger Stock Subros Ltd share  Sakal
Share Market

Multibagger Stock: 10 वर्षात 1 लाखाचे झाले 25 लाख, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

Multibagger Stock: शेअर बाजारात गुंतवणूक करुन दमदार नफा कमवायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अशात तुम्ही सुब्रोस लिमिटेडच्या (Subros Ltd) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी काळात बंपर परतावा दिला आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर बाजारात गुंतवणूक करुन दमदार नफा कमवायचा असेल तर तुम्हाला चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अशात तुम्ही सुब्रोस लिमिटेडच्या (Subros Ltd) शेअर्सवर लक्ष ठेवू शकता.

या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी काळात बंपर परतावा दिला आहे. ऑटोमोटिव्ह एअर कंडिशनिंग सोल्यूशन्स सेवा देणार्‍या सुब्रोसच्या शेअर्समध्ये नुकतीच 7.74 टक्क्यांची वाढ दिसून आली.

हा शेअर 676.35 रुपयांवर बंद झाला. यासह कंपनीचे मार्केट कॅप 4412.22 कोटी झाले. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 697.50 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 272 रुपये आहे.

सुब्रोस लिमिटेड कंपनीला नुकतीच 25 कोटीची नवीन ऑर्डर मिळाली आहे. 9 डिसेंबर 2023 रोजी, कंपनीला भारतीय रेल्वेकडून डब्यांच्या छतावर बसवलेल्या एअर कंडिशनरचा पुरवठा आणि कमिशनिंगसाठी ही नवीन ऑर्डर मिळाली.

कंपनी आता कोच एअर कंडिशनर्सवर फोकस करत आहे. कंपनी रेल्वे इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये आपला व्यवसाय वाढवत आहे.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 55 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 123 टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या 5 वर्षांत हा शेअर 155 टक्क्यांनी वाढला आहे. इतकेच नाही तर गेल्या 10 वर्षात गुंतवणूकदारांना 2452 टक्के बंपर नफा मिळाला आहे.

जानेवारी 2014 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 26.50 रुपये होती, ती आज 676.35 रुपये झाली आहे. याचा अर्थ या काळात गुंतवणूकदारांच्या पैशात 25 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमची रक्कम 25 लाख झाली असती.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT