Multibagger Stocks Sakal
Share Market

Multibagger Stocks: गुंतवणूकदारांना मालामाल करणारी कंपनी देणार बोनस शेअर्स, जाणून घ्या रेकॉर्ड डेट

Multibagger Stock Updates: कंपनीने 1:2 च्या प्रमाणात बोनस जारी करण्याची घोषणा केली आहे.

शिल्पा गुजर

Multibagger Stock Updates: शेअर बाजारात सजग राहात पैशांची गुंतवणूक केली तर तुम्हाला दमदार परतावा मिळू शकतो. पण त्यासाठी मजबूत फंडामेंटल्स असणारे शेअर्स तुमच्या लिस्टमध्ये असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक दमदार स्टॉक घेऊन आलो आहोत. रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी लँकर होल्डिंग्सच्या (Lancor Holdings) शेअर्सने अतिशय कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे.

आता तर कंपनीने 1:2 च्या प्रमाणात बोनस जारी करण्याची घोषणा केली आहे. सध्या हा शेअर एनएसईवर 50 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 202.50 कोटी आहे.

लॅन्कोर होल्डिंग्ज 1:2 प्रमाणात शेअरधारकांना बोनस शेअर जारी करेल. भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक दोन इक्विटी शेअर्समागे एक बोनस इक्विटी शेअर दिला जाईल.

18 ऑगस्ट 2023 ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आली आहे. बोनस शेअर्स 12 सप्टेंबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी जमा केले जातील. कंपनी आपल्या फ्री रिझर्व्हमधून इश्यूसाठी 4.05 कोटी वापरणार आहे.

गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक 57 टक्क्यांनी वाढला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 74 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा मिळाला आहे.

इतकेच नाही तर गेल्या 3 वर्षात त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 1580% चा बंपर नफा दिला आहे. लॅन्कोर होल्डिंग्ज रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, कमर्शियल प्रॉपर्टीज लीजवर देण्यासंबंधित व्यवसायात गुंतली आहे. कंपनीने जून तिमाहीचे निकाल अद्याप जाहीर केलेले नाहीत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

SCROLL FOR NEXT