Share Market  sakal
Share Market

Multibagger Stock Updates: 5 वर्षात गुंतवणुकदारांच्या संपत्तीत 60 पटीने वाढ, तुम्ही केली आहे का 'या' शेअरमध्ये गुंतवणूक?

Multibagger Stock Updates: जुलै 2018 मध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत 12 रुपये होती, जी आता 731 रुपये झाली आहे.

शिल्पा गुजर

Multibagger Stock Updates: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा मिळतो. असे मल्टीबॅगर शेअर्स शोधायचे कसे याबाबत आम्ही तुम्हाला दरदिवशी माहिती देत असतो. शेअर मार्केटमध्ये संयम हा खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण लाँग टर्मची गुंतवणूक तुम्हाला कायम दमदार परतावा देते.

आज आम्ही असाच एक स्टॉक घेऊन येत आहोत. रेफेक्स इंडस्ट्रीजच्या (Refex Industries) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना कायम बंपर नफा मिळवून दिला आहे.

नुकतेच कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट गाठले आणि एनएसईवर सध्या हे शेअर्स 731 रुपयांवर ट्रेड करत आहेत. अशात कंपनीचे मार्केट कॅप वाढून 1615.03 कोटी झाले आहे.

रेफेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात 41 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्यांनी 192 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे.

गेल्या एका वर्षात त्यांच्या गुंतवणूकदारांनी 528 टक्के नफा कमावला आहे. इतकेच नाही तर गेल्या तीन वर्षांत त्याच्या शेअर्समध्ये 1413 टक्‍क्‍यांची तेजी दिसून आली. त्याच वेळी, गेल्या 5 वर्षांत 5,910 टक्क्यांची मजबूत तेजी दिसली.

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच जुलै 2018 मध्ये रेफेक्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 12 रुपये होती, जी आता 731 रुपये झाली आहे. याचा अर्थ या कालावधीत गुंतवणूकदारांच्या पैशात 60 पट वाढ झाली आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी त्यात 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 60 लाख झाले असते.

रेफेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील एक स्पेशालिस्ट मॅन्युफॅक्चरर आणि रेफ्रिजरंट गॅसेसची रि-फिलर आहे. कंपनी हायड्रोफ्लोरोकार्बन्स (HFCs) नावाचे नॉन-ओझोन कमी करणारे रेफ्रिजरंट वायू पुरवते, जे एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स आणि रेफ्रिजरेटिंग उपकरणांमध्ये वापरले जातात.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT