Multibagger Stock Updates Sakal
Share Market

Multibagger Stock: व्हील कंपनीने बनवले करोडपती, बाजारात घसरण असूनही शेअरमध्ये 3% वाढ, तेजीचा तज्ज्ञांचा विश्वास

Multibagger Stock Updates: सध्या बीएसई स्मॉलकॅपवर कंपनीचे शेअर्स 3.27 टक्क्यांच्या वाढीसह 247.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

राहुल शेळके

Multibagger Stock Updates: स्टील आणि ऍलॉय व्हील्सची आघाडीची कंपनी असलेल्या स्टील स्ट्रिप्स व्हील्सचे (Steel Strips Wheels) शेअर्स बाजारातील घसरणीच्या वातावरणातही मजबूत दिसत आहेत. या शेअर्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

आता बाजारातील तज्ज्ञांना यामध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. सध्या बीएसई स्मॉलकॅपवर स्टील स्ट्रिप्स व्हील्सचे शेअर्स 3.27 टक्क्यांच्या वाढीसह 247.80 रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचे मार्केट कॅप 3,878.40 कोटी आहे.

8 ऑगस्ट 2003 रोजी स्टील स्ट्रिप्स व्हील्सचे शेअर्स फक्त 2.21 रुपयांना मिळत होते, पण आता ते 247.80 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच 20 वर्षांत गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये 1.12 कोटी रुपयांमध्ये रुपांतरीत झालेत.

30 जानेवारी 2023 रोजी हे शेअर्स 126.20 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होते. यानंतर, 6 महिन्यांत 104 टक्क्यांहून अधिक तेजीसह ते 26 जुलै 2023 रोजी 258.10 रुपयांचा विक्रमी उच्चांकावर गेले. नंतर प्रॉफीट बुकींगमुळे यात 4 टक्क्यांची घसरण झाली.

स्टील आणि ऍलॉय व्हील्स बनवणाफ्या स्टील स्ट्रीप्स व्हिलचे एक्सपोर्ट मार्केटमध्ये मजबूत स्थान आहे. ही कंपनी जगातील सर्वात कमी किंमतीत अलॉय व्हील्सचे उत्पादन करते, याचा अर्थ मार्जिन सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे.

ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्ससाठी ऍलॉय व्हील स्पेसमधील कंपनीची ऑर्डर बुक आर्थिक वर्ष 2026 पर्यंत फुल आहे. त्यामुळेच ब्रोकरेज फर्म आशिका रिसर्चने या शेअर्सवर बाय रेटिंगसह (Buy Rating) 301 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT