Multibagger Stock Updates Sakal
Share Market

Multibagger Stock Updates: 3 रुपयांचा शेअर पोहचला 1,200 रुपयांवर, 25 हजारात गुंतवणूकदार बनले करोडपती

Multibagger Stock Updates: या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock Updates: शेअर मार्केट तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला जास्त पैसे कमवायचे असतील, तर योग्य शेअरमध्ये गुंतवणूक करुन दीर्घकाळ संयम ठेवा. असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना 8 वर्षात आणि 10 वर्षात करोडपती बनवले आहे.

यातील एक शेअर म्हणजे कम्युनिकेशन कंपनी तानला प्लॅटफॉर्मचा शेअर. दीर्घ मुदतीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

या शेअरने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरने 10 वर्षात 25 हजार रुपयांच्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे.

शुक्रवारी, शेअर 0.44 टक्क्यांच्या किरकोळ वाढीसह 1,220 रुपयांवर बंद झाला. 26 जुलै 2013 रोजी तानला प्लॅटफॉर्मचे शेअर्स रु 3.05 वर विकले जात होते. मात्र आता त्यांनी 1,200 रुपयांचा आकडा पार केला आहे.

म्हणजेच, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्टॉकवर 25,000 रुपयांची गुंतवणूक केली असती, तर तो आज करोडपती झाला असता. या वर्षी 27 मार्च रोजी हा शेअर 506 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.

4 महिन्यांत 160 टक्के वाढ

मार्चनंतर, या शेअरमध्ये खरेदी वाढली आणि 24 जुलै 2023 रोजी तो चार महिन्यांत 160 टक्क्यांनी वाढून 1317.70 रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर पोहोचला. मात्र, त्यानंतर प्रॉफिट बुकींगमुळे शेअरचा वेग कमी झाला आणि अवघ्या दोन दिवसांत तो पाच टक्क्यांनी घसरला.

तानला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचे देशांतर्गत ब्रोकरेज गुंतवणूकदारांसाठी एक संधी म्हणून वर्णन करत आहेत. या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे ते सांगतात.

कंपनीची आर्थिक कामगिरी

जून तिमाहीत, तानला प्लॅटफॉर्मचा महसूल तिमाही आधारावर 9.3 टक्के दराने वाढला आहे. गेल्या सात तिमाहीतील ही सर्वाधिक वाढ आहे.

जून तिमाहीत कंपनीने 916.17 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कालावधीत, तानला प्लॅटफॉर्मचा नफा 12.57 टक्क्यांनी वाढून 135.40 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

कंपनी काय करते?

तानला प्लॅटफॉर्म संगणक सॉफ्टवेअर विकसित करते. कंपनी मेसेजिंग, व्हॉइस, इंटरनेट आणि इतर क्लाउड कम्युनिकेशन सोल्यूशन्सची सेवा पुरवते.

याशिवाय, कंपनी प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित आणि वितरित करते. एक्स्चेंजवर उपलब्ध असलेल्या डेटानुसार, कंपनीचा बहुसंख्य शेअर लोकांकडे आहेत.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT