Multibagger Stock  Sakal
Share Market

Multibagger Stock: 3 वर्षात 430% रिटर्न, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का 'हा' शेअर?

Multibagger Stock : कंपनीचे मार्केट कॅप 1.14 लाख कोटी रुपये आहे.

राहुल शेळके

Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करुन अनेकांना मोठा फायदा झाल्याचं आपण कायम ऐकतो. पण शेअर बाजारात जसा फायदा होतो तसेच नुकसानही होते. त्यामुळे चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे.

असाच एक दमदार शेअर आहे वरुण बेव्हरेजेसचा (Varun Beverages). या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना कमी कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला आहे. पेप्सिकोच्या बॉटलर कंपनीच्या स्टॉकमध्ये गेल्या तीन वर्षांत 400 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

नुकतेच हे शेअर्स 0.27 टक्क्यांनी घसरले आणि 884.85 रुपयांवर बंद झाले. कंपनीचे मार्केट कॅप 1.14 लाख कोटी रुपये आहे.

वरुण बेव्हरेजेस तिमाही कमाईसाठी जानेवारी-डिसेंबरचे शेड्यूल फॉलो करते. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा कंसोलिडेटेड नेट प्रॉफिट 25.36 टक्क्यांनी वाढून 1005.42 कोटी झाला आहे.

वाढीव महसूल आणि चांगले मार्जिन यामुळे ही तेजी दिसून आली आहे. या तुलनेत गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीला 802.01 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.

वरुण बेव्हरेजेसचे शेअर्स गेल्या एका महिन्यात 10 टक्क्यांनी वधारले आहेत. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत त्याने 37 टक्क्यांचा शानदार परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षात स्टॉक 72 टक्क्यांनी वाढला आहे.

इतकेच नाही तर गेल्या 3 वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 430% चा दमदार नफा दिला आहे. वरुण बेव्हरेजेस ही अमेरिके बाहेरील जगातील पेप्सिकोची सर्वात मोठी फ्रँचायझी आहे. कंपनीचे मार्केट कॅप सध्या 1.14 लाख कोटी आहे. वरुण बेव्हरेजेस ही मार्केट कॅपच्या दृष्टीने भारतातील चौथी सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT