Multibagger Stocks Sakal
Share Market

Multibagger Stocks: 15 रुपयांच्या शेअरने बनवले कोट्यधीश, तुमच्याकडे आहे का 'हा' शेअर?

Multibagger Stocks: शेअरने केवळ 10 वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

राहुल शेळके

Multibagger Stocks: स्ट्रक्चरल स्टील ट्यूब कंपनी एपीएल अपोलो ट्यूब्सच्या (APL Apollo Tubes) शेअर्सने दोन दिवसांपूर्वी विक्रमी उच्चांक गाठला होता. या शेअर्सने केवळ 10 वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. हा स्टॉक लाँग टर्म तसेच शॉर्ट टर्मसाठीही गुंतवणुकदारांच्या फायद्याचा आहे.

दोन दिवसांपूर्वी 10 महिन्यांत 82 टक्क्यांहून अधिक तेजीसह विक्रमी उच्चांक गाठला होता. पण आता या उच्च पातळीपासून तो 5 टक्क्यांनी घसरला आहे.

एपीएल अपोलो ट्युब्सचे शेअर्स आता घसरले असले तरी ही खरेदी करण्याची सुवर्णसंधी मानली पाहिजे असे शेअर बाजार एक्सपर्ट मानत आहेत. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या मते, सध्याच्या पातळीपासून एपीएल अपोलो ट्युब्सचे शेअर्स सुमारे 17 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यांच्या शेअर्सची किंमत सध्या 1715.15 रुपये आहे.

13 सप्टेंबर 2013 रोजी एपीएल अपोलो ट्यूब्सचे शेअर्स फक्त 15 रुपयांना होते. आता ते वाढून 1715.15 रुपयांवर पोहोचले आहेत, म्हणजेच अवघ्या 10 वर्षांत 88 हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर 2022 रोजी तो 990 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता. यानंतर, 10 महिन्यांत ते 82 टक्क्यांहून अधिक वाढले आणि 6 सप्टेंबर 2023 रोजी 1,806.20 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मात्र, प्रॉफिट बुकींगमुळे तो खाली आला आणि सध्या या पातळीपासून 5 टक्के खाली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT