Multibagger Stock Sakal
Share Market

Multibagger Stocks: 8 वर्षात गुंतवणूकदार झाले कोट्यधीश, 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा

Multibagger Stocks: कंपनीचे शेअर्स बीएसईवर 810.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

राहुल शेळके

Multibagger Stocks: शेअर बाजारात संयमाने गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. चांगल्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक कायमच चांगला परतावा देते. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी लाँग टर्ममध्ये उत्कृष्ट परतावा दिला आहे आणि काही शेअर्स असे आहेत ज्यांनी अतिशय कमी काळात चांगला नफा कमवून दिला आहे.

असाच एक शेअर आहे कृषी रसायन कंपनी किलपेस्टचा (Killpest) आहे. या शेअरने अवघ्या 8 वर्षात 1 लाखाच्या गुंतवणुकीवर आपल्या गुंतवणुकदारांना कोट्यधीश बनवले आहे. एका वर्षात त्यात अडीच पटीने गुंतवणूक वाढली असल्याचे समोर येते आहे.

हा शेअर सध्याच्या पातळीपासून 46 टक्क्यांच्या वर जाऊ शकतो असे बाजारातील तज्ज्ञ सांगत आहेत. त्याचे शेअर्स बीएसईवर 810.15 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

24 सप्टेंबर 2015 रोजी किलपेस्टचे शेअर्स फक्त 7.90 रुपयांना होते. आता ते 10,155 टक्क्यांनी वाढून 810.15 रुपयांवर पोहोचले आहेत, म्हणजेच किल्पेस्टने अवघ्या 8 वर्षांत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 1 कोटी केले. गेल्या वर्षी 29 सप्टेंबर 2022 रोजी तो 315.05 रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता.

यानंतर, एका वर्षापेक्षा कमी कालावधीत, तो 175 टक्क्यांहून अधिक वाढला आणि 11 सप्टेंबर 2023 रोजी 867 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

ब्रोकरेज फर्म नुवामाने 11 सप्टेंबरच्या संशोधन अहवालात किलपेस्टला बाय रेटिंग दिले आहे. भारतातील मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक्सची बाजारपेठ सुमारे 300-400 कोटी रुपयांची आहे आणि यात किलपेस्टचा 10-12.5 टक्के वाटा आहे, याचा अर्थ किलपेस्टच्या वाढीची भरपूर क्षमता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT