Gautam Adani Sakal
Share Market

Mutual Funds : अदानी समूहाला म्युच्युअल फंडचा दणका; 'या' कंपन्यांमधील हिस्सेदारी केली कमी

जानेवारी महिन्यापासून हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Mutual Funds : गेल्या जानेवारीत हिंडेनबर्गच्या अहवालानंतर गौतम अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळले. या काळात केवळ गुंतवणूकदारांनी अदानी समूह सोडला नाही तर म्युच्युअल फंडांनीही त्यांचे स्टेक कमी केले आहेत.

ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म ICICIDirect च्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडांनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी टोटल गॅस आणि अंबुजा सिमेंट्समधील होल्डिंग कमी केले आहे.

फेब्रुवारी 2023 मध्ये ही हिस्सेदारी कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वेदांत, टाटा पॉवर, बँक ऑफ बडोदा, यूपीएल आदी म्युच्युअल फंडांची विक्रीही दिसून आली. (Mutual funds cut stakes Adani Enterprises, Adani Ports, Ambuja Cements shares in February, 5 Adani group stocks on buy radar)

अदानी समूहाच्या आठ सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स बुधवारी वाढीसह बंद झाले. अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (AEL) चे शेअर्स बीएसईवर 5.81 टक्क्यांनी वाढून 1,838.80 रुपयांवर बंद झाले. कंपनीने बीएसईवर रु. 1,891.10 या इंट्राडे उच्चांकापर्यंत मजल मारली.

त्याच वेळी त्याचे बाजार भांडवल वाढून 2.09 लाख कोटी रुपये झाले. अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचे शेअर्स 3.81 टक्क्यांनी वाढून 679.10 रुपयांवर बंद झाले.

याशिवाय अदानी ट्रान्समिशन 3.27 टक्क्यांनी वाढून 931 रुपये आणि अंबुजा सिमेंट 3.28 टक्क्यांनी वाढून 364.95 रुपयांवर बंद झाले.

त्याच वेळी, अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 4.94 टक्क्यांनी वाढून 740.95 रुपयांवर बंद झाला. अदानी विल्मार 3.12 टक्क्यांनी वाढून 426.70 रुपयांवर आणि एनडीटीव्ही 0.85 टक्क्यांनी वाढून 212.85 रुपयांवर बंद झाले. ACC देखील 0.11 टक्क्यांनी वाढून 1,740.40 रुपये झाला.

दुसरीकडे अदानी टोटल गॅसचे शेअर्स 3.05 टक्क्यांनी घरून 918.85 रुपयांवर बंद झाले. याशिवाय अदानी पॉवरही 1.27 टक्क्यांनी घसरून 202.15 रुपयांवर बंद झाला. या कंपन्यांच्या शेअर्सनीही बीएसईवर घसरण दर्शवली आहे.

एकीकडे गौतम अदानी यांचा अदानी समूह बँकांमधील कर्ज कमी करण्याच्या तयारीत आहे. गौतम अदानी यांना आता कर्जाचा बोजा कमी करायचा आहे. अदानी समूह आता यासाठी निधी उभारण्याच्या तयारीत आहे.

अदानी समूह निधी उभारण्यासाठी अंबुजा सिमेंटमधील हिस्सा विकण्याच्या प्रक्रियेत आहे. याच दरम्यान आता म्युच्युअल फंडांनी अदानी समूहामधील हिस्सेदारी कमी केली आहे. त्याचा मोठा फटका आता अदानी समूहाला बसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT