Narayana Murthy's 5-month-old grandson set to pocket Rs 4.2 crore as Infosys announces dividend  Sakal
Share Market

Narayana Murthy: नारायण मूर्तींचा 5 महिन्याचा नातू आहे करोडपती; एकाच महिन्यात कमावले 4.2 कोटी रुपये

Infosys Dividend: 4 महिन्यांच्या बाळाची संपत्ती तब्बल 210 कोटी रुपये आहे हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल आणि ते बाळ आता 5 महिन्यांचे झाले आहे. त्याची पहिली कमाई म्हणून त्याला 4 कोटी रुपये मिळाले आहे.

राहुल शेळके

Infosys Dividend: 4 महिन्यांच्या बाळाची संपत्ती तब्बल 210 कोटी रुपये आहे हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल आणि ते बाळ आता 5 महिन्यांचे झाले आहे. त्याची पहिली कमाई म्हणून त्याला 4.2 कोटी रुपये मिळाले आहे.

नारायण मूर्ती यांनी इन्फोसिसचे 0.04 टक्के स्टेक किंवा 15 लाख शेअर्स त्यांच्या 4 महिन्यांचा नातू एकग्रा रोहन मूर्तीला हस्तांतरित केले होते. या शेअर्सची किंमत अंदाजे 210 कोटी रुपये आहे. आता त्या बाळाला इन्फोसिसकडून 4.2 कोटी रुपयांचा पहिला लाभांश मिळाला आहे.

इन्फोसिस या आयटी कंपनीने 18 एप्रिल रोजी लाभांश जाहीर केला होता. गेल्या महिन्यात, नारायण मूर्ती यांनी एकग्राला 240 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे शेअर्स गिफ्ट दिले होते. एकग्रचा आयटी कंपनीमध्ये 15 लाख शेअर्स किंवा 0.04% हिस्सा होता. एकूण 28 रुपयांच्या लाभांशाचा विचार केल्यास, एकग्राला 4.2 कोटी रुपये लाभांश स्वरुपात मिळाले आहेत.

एकाग्रला एका महिन्यात 30 कोटी रुपयांचे नुकसान

एकग्रच्या इन्फोसिसच्या शेअर्सचे एकूण मूल्य 30 कोटींनी घसरले आहे कारण ते गिफ्ट दिल्यानंतर प्रत्येक शेअर सुमारे 200 रुपयांनी घसरला आहे. आज, म्हणजे 19 एप्रिल रोजी सकाळी 11:15 वाजता, इन्फोसिसचे शेअर्स 1.2% घसरून 1,402.4 रुपयांवर व्यवहार करत होते. नातवाला शेअर्स गिफ्ट दिल्यानंतर नारायण मूर्तींची इन्फोसिसमधील भागीदारी 0.40 टक्क्यांवरून 0.36 टक्के किंवा 1.51 कोटी शेअर्सवर आली.

नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि त्यांची पत्नी अपर्णा यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये कुटुंबातील नवीन सदस्याच्या आगमनाची घोषणा केली होती. कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव एकग्र ठेवण्यात आले आहे. नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक (जावई) यांना 2 मुले आहेत. नुकतीच नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT