ए क्सप्लेओ सोल्यूशन्स लि. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात कार्यरत असून, ‘निफ्टी आयटी’ निर्देशांकांत तिचा समावेश होतो.
ऋत्विक जाधव
ए क्सप्लेओ सोल्यूशन्स लि. ही कंपनी माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात कार्यरत असून, ‘निफ्टी आयटी’ निर्देशांकांत तिचा समावेश होतो. या कंपनीचे भांडवली बाजारमूल्य रु. २,५०,१९३. ७१ लाख इतके असून, ही कंपनी एक्सप्लेओ समूहाचा एक भाग आहे.
ही कंपनी जागतिक स्तरावर अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि सल्लागार सेवा प्रदान करते. मोठमोठ्या कंपन्यांसोबत भागीदारी करून त्यांना त्यांच्या व्यवसायातील परिवर्तनासाठी ती मार्गदर्शन करते. कंपन्यांना कामकाजातील उत्कृष्टता आणण्यासाठी मदत करून त्यांच्या व्यवसायातील उद्दिष्ट गाठण्यास मदत करते.
ही कंपनी भारतासह अमेरिका, ब्रिटन, युरोप, मध्य पूर्वेकडील देश आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात येथे २५ वर्षांहून अधिक काळ यशस्वीरित्या कार्यरत असून, १५० पेक्षा जास्त बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा कंपन्यांना डिजिटल परिवर्तन कार्यक्रमाद्वारे संपूर्ण तंत्रज्ञान पुरवते.
एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कंपनी जवळजवळ कर्जमुक्त आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत ३३.२ टक्के ‘सीएजीआर’ची चांगली नफा वाढ नोंदवली आहे आणि शेअरवर चांगला परतावासुद्धा दिला आहे.
कार्यक्षेत्र
कंपनी बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा कंपन्यांसाठी विविध चाचणी सेवा देते. चाचणी व्यवस्थापन, कार्यात्मक चाचणी, नॉन-फंक्शन चाचणी, उत्पादन चाचणी, अनुपालन चाचणी, मोबाईल चाचणी आणि व्यवस्थापित चाचणी सेवा. डेटा विकास, डेटा चाचणी आणि डेटा प्रशासन असे तंत्रज्ञानदेखील पुरवते.
तांत्रिक विश्लेषण
या शेअरचा चार्ट पॅटर्न इतरांच्या तुलनेत सर्वांत मजबूत आहे. एक्सप्लेओ सोल्यूशन्स कंपनीचा शेअर गेल्या काही दिवसांपासून भक्कम मजबुतीची चिन्हे दाखवत असून, त्याने जोरदार ब्रेकआउट दिला आहे. एप्रिल २०२३ पासून तयार होत असलेल्या ‘अप फ्लॅग पॅटर्न’ची निर्मिती आपण पाहू शकतो.
हे भविष्यात शेअरची ताकद आणि क्षमता दर्शवते. डेरिव्हेटिव्ह डेटादेखील तेजीच्या बाजूने आहे. भविष्यातील ‘ओआय’मध्ये लाँग बिल्ड-अप दिसून येतो, जो अल्पावधीतही भक्कम वाढ दर्शवतो. त्यामुळे रु. १,६३२ किंमतीच्या आसपास ट्रेडिंग करताना साप्ताहिक क्लोजिंग आधारावर १,५५० रुपयांचा स्टॉप-लॉस ठेवून १,५९० ते १६०० रुपयांच्या पट्ट्यात मिळेल तेव्हा हा शेअर घेतला पाहिजे.
येत्या काही दिवसांत या शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या शेअरमध्ये मध्यम मुदतीसाठी, १९०० रुपयांचे उद्दिष्ट आहे. अल्प-मुदतीच्या उद्दिष्टासाठी, रिस्क टू रिवॉर्ड रेशो १:३ आहे. अल्प जोखीम घेऊन सुमारे १६ टक्के नफ्याची अपेक्षा ठेवून यात गुंतवणूक करणे योग्य ठरेल.
शेअरचे नाव ः एक्सप्लेओ सोल्यूशन्स
शिफारस ः खरेदी
सध्याचा भाव ः रु. १,६३२
स्टॉप लॉस ः रु.१,५५०
उद्दिष्ट ः रु. १,९००
कालावधी ः ३ ते ६ महिने
Disclaimer & Disclosure ः वरील शिफारस पूर्णपणे तांत्रिक विश्लेषणावर आधारित आहे, जी भविष्यातील किमतीच्या हालचालीचा अंदाज लावण्याचा एक प्रकारचा वैज्ञानिक मार्ग आहे. सर्व गुंतवणूकदारांनी इक्विटी गुंतवणुकीतील जोखमींबद्दल योग्य माहिती घ्यावी. ऋत्विक जाधव यांचे यात कोणतेही वैयक्तिक हितसंबंध नाहीत आणि शेअरमध्ये गुंतवणूक नाही. तथापि,त्यांच्या काही क्लायंट्सची यात गुंतवणूक असू शकते.
(लेखक तांत्रिक विश्लेषक असून, किरण जाधव ॲँड असोसिएट्स, पुणे येथे कार्यरत आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.