Nippon India Silver ETF share stock analysis investment Sakal
Share Market

सिल्व्हरबीज (शुक्रवारचा बंद भाव : रु. ७७.८७)

एकीकडे शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’ निर्देशांक नवे उच्चांक गाठत असतानाच, गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदी यांचे भावदेखील नवनवे उच्चांक नोंदवत होते. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावाने नवा उच्चांक नोंदवला.

भूषण गोडबोले

एकीकडे शेअर बाजारात ‘सेन्सेक्स’ व ‘निफ्टी’ निर्देशांक नवे उच्चांक गाठत असतानाच, गेल्या महिन्याभरात सोने आणि चांदी यांचे भावदेखील नवनवे उच्चांक नोंदवत होते. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावाने नवा उच्चांक नोंदवला.

दीर्घावधीच्या आलेखानुसार, चांदीच्या भावात होत असलेल्या चढ-उतारांचा विचार करता, वायदे बाजारानुसार २०११ मध्ये प्रतिकिलो ७३,६०० रुपयांचा उच्चांक दर्शविल्यानंतर ३० एप्रिल २०११ पासून गेल्या १२ ते १३ वर्षे चांदीचा भाव मर्यादित पातळ्यांमध्येच हेलकावे घेत आहे. त्यामुळे गेल्या १३ वर्षांत चांदीमधील गुंतवणुकीतून मर्यादित परतावा मिळाला आहे.

चांदी हा एक मौल्यवान धातू आहे; तसेच चांदीचा वापर औद्योगिक क्षेत्रातदेखील केला जातो. स्मार्टफोन, सौर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहने, ऑटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही स्क्रीन, फाइव्ह-जी नेटवर्क, बायो-फार्मा; तसेच वैद्यकीय तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण अनुप्रयोगांसह, चांदीची औद्योगिक मागणी वाढत आहे.

आलेखानुसार, गेल्या आठवड्यात ७७,९४९ रुपये या पातळीच्या वर चांदीने बंद भाव दिल्याने दीर्घावधीसाठी तेजीचे संकेत मिळत आहेत. या तेजीच्या संकेतांमुळे दीर्घावधीमध्ये चांदीच्या भावातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, ज्याकडे गुंतवणूकदारांनी जरूर लक्ष ठेवावे.

गुंतवणूकदारांसाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर आणि किफायतशीर ‘एक्सचेंज ट्रेडेड फंड’ (ईटीएफ) हा मार्गदेखील उपलब्ध आहे. चांदीच्या ‘ईटीएफ’चा शेअर बाजारात व्यवहार केला जातो.

डी-मॅट आणि ट्रेडिंग खात्यासह, गुंतवणूकदार लहान मूल्यांमध्ये ‘ईटीएफ-युनिट’ खरेदी; तसेच विक्री करू शकतात. दीर्घावधीसाठी ‘निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ-सिल्व्हरबीज’ या एक्स्चेंज ट्रेडेड फंडात अर्थात ‘सिल्व्हरबीज’च्या स्वरूपात चांदीतदेखील जोखीम लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदार विचार करू शकतात.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT