NSE F&O Trading Time Sakal
Share Market

F&O Trading: शेअर बाजारातील ट्रेडर्ससाठी मोठी बातमी! F&O च्या वेळेत होणार बदल, NSEचा काय आहे प्लॅन?

F&O Trading Time: शेअर बाजारात व्यापार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

राहुल शेळके

F&O Trading Time: शेअर बाजारात ट्रेडिंग करणे दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही वर्षांत, विशेषत: कोरोनानंतर, बाजारात व्यापार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तुम्हीही शेअर बाजारात व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शेअर बाजारातील ट्रेडिंगबाबत मार्केट रेग्युलेटर मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे, ज्याचा परिणाम सर्व ट्रेडर्सवर होणार आहे.

देशातील सर्वात मोठे स्टॉक एक्स्चेंज NSE F&O ट्रेडिंगचे तास वाढवण्यावर काम करत आहे. याची अंमलबजावणी झाल्यास F&O गुंतवणूकदार दीर्घकाळ व्यापार करू शकतात. राष्ट्रीय शेअर बाजार मध्यरात्रीपर्यंत व्यवहाराचा पर्याय देऊ शकतो.

Economic Timesच्या अहवालानुसार, नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत शेअर बाजार बंद झाल्यानंतरही F&O मध्ये व्यापार करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ट्रेडिंग होऊ शकते, असा प्रस्ताव सेबी समोर ठेवण्यात आला आहे.

मध्यरात्रीपर्यंत वेळ वाढविण्याचा प्रस्ताव

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची वेळ मध्यरात्रीपर्यंत वाढवू शकते, असेही या अहवालात सांगण्यात येत आहे. याचा अर्थ NSE F&O ट्रेडिंग सत्र रात्री 11:30 पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे.

स्टॉक ट्रेडिंगची वेळ देखील वाढणार?

NSE ने आपला प्रस्ताव सेबीकडे मंजुरीसाठी पाठवला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सेबीने यापूर्वीच नियम बनवले आहेत जे एक्स्चेंजना F&O ट्रेडिंग रात्री 11:55 पर्यंत आणि स्टॉक ट्रेडिंग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू ठेवू शकतात.

NSEचा प्रस्ताव काय आहे?

एक्स्चेंजने संध्याकाळच्या व्यापारासाठी गेल्या काही महिन्यांपासून ब्रोकर्स आणि बाजारातील इतर ट्रेडर्सची चर्चा केली आहे. संध्याकाळच्या सत्रात निफ्टी आणि बँक निफ्टीसह F&O लाँच करण्याचा प्रस्ताव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT