Ola Electric Shares Fall Sakal
Share Market

Ola Share: ओलाच्या सीईओला कामरासोबतचा वाद पडला महागात; कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले, काय आहे प्रकरण?

Ola Electric Shares Fall: ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांचे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरासोबतचा 'x'वरील वाद महागात पडला आहे. सोशल मीडियावरील या जोरदार चर्चेचा परिणाम ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सवर दिसून आला.

राहुल शेळके

Ola Electric Shares Fall: ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल यांचे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरासोबतचा 'x' वरील वाद महागात पडला आहे. सोशल मीडियावरील या जोरदार चर्चेचा परिणाम ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सवर दिसून आला. ओलाचे शेअर्स सोमवारी ट्रेडिंगदरम्यान 10 टक्क्यांनी घसरले आणि शेवटी आठ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

रविवारी, ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या गुणवत्तेच्या मुद्द्यावरून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भाविश अग्रवाल आणि स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात सोशल मीडियावर जोरदार वाद झाला.

ओलाचे शेअर्स घसरले

यानंतर, सोमवारी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स 8.31 टक्क्यांनी घसरले आणि बीएसईवर प्रति शेअर 90.82 रुपयांवर बंद झाले. शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शेअर 9.43 टक्क्यांनी घसरून 89.71 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 8.38 टक्क्यांनी घसरून 90.75 रुपयांवर बंद झाला.

या वर्षी ऑगस्टमध्ये, ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीचे शेअर्स 76 रुपयांच्या इश्यू किमतीवर लिस्ट झाले होते. यानंतर शेअरचा भाव 157.4 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. या पातळीपासून स्टॉक 43 टक्क्यांनी घसरला आहे.

मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण

या घसरणीसह, ओला इलेक्ट्रिकचे बाजार भांडवल शेअर बाजारात पदार्पण केल्यानंतर सोमवारी प्रथमच 5 अब्ज डॉलरच्या (41,000 कोटी) खाली घसरले. ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स गेल्या महिन्यात बाजारात लिस्ट झाले तेव्हा कंपनीचे बाजार भांडवल 7 अब्ज डॉलर (58,000 कोटी) होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT