Oriental Rail Infra share Rs 485 cr order from Indian Railways Multibagger stock hits 5 percent upper circuit  Sakal
Share Market

Railway Stock: रेल्वे शेअर्स सुसाट! 485 कोटींची ऑर्डर मिळाल्यानंतर 'या' शेअर्समध्ये तुफान तेजी

Oriental Rail Infra share: रेल्वेचे स्टॉक्स गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या तेजीत दिसत आहेत.

राहुल शेळके

Oriental Rail Infra share: रेल्वेचे स्टॉक्स गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या तेजीत दिसत आहेत. सरकारने रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी दरवर्षी 2 लाख कोटीहून अधिक खर्च करण्याचे ठरवले आहे.

2023 चे रेल्वे बजेट 2.4 लाख कोटी होते. अशात खासगी क्षेत्रातील ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडलाही (Oriental Rail Infra) मोठी ऑर्डर मिळाली आहे. शेअरमध्ये नुकताच 5% अप्पर सर्किट लागले आणि तो 167 रुपयांपर्यंत पोहोचला.

ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला रेल्वे बोर्ड आणि भारतीय रेल्वेकडून 485.08 कोटींची मोठी ऑर्डर मिळाली आहे. या अंतर्गत कंपनी 1200 BOXNS वॅगन्स बनवणार आहे. ही बोगी वरून खुली होते. कंपनीला ही ऑर्डर 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करायची आहे.

30 सप्टेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या एकत्रित ऑर्डर बुकची किंमत 1334.27 कोटी आहे. तेव्हापासून कंपनीला सातत्याने ऑर्डर्स मिळत आहेत. बीएसईच्या आकडेवारीनुसार, यापूर्वी 18 नोव्हेंबरला कंपनीला 7.27 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या होत्या, तर 17 नोव्हेंबरला 19.91 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाल्या होत्या.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 325.13 कोटी होता. सप्टेंबर 2023 पर्यंत ऑर्डर बुक 1334 कोटी होती आणि त्यानंतरही अनेक मोठ्या ऑर्डर मिळाल्या आहेत. या नवीन ऑर्डर्सनंतर हा शेअर 5 टक्के अप्पर सर्किटसह 167 रुपयांवर ट्रेड करत आहे.

आतापर्यंतचा उच्चांक 176 आहे. हा शेअर एका महिन्यात 45 टक्के, तीन महिन्यांत 113 टक्के, सहा महिन्यांत 250 टक्के आणि यावर्षी आतापर्यंत 122 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 900 कोटी आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT