Owais Metal and Mineral Processing IPO: Check date, price band, and other key details Sakal
Share Market

Upcoming IPO: ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंगचा IPO 26 फेब्रुवारीला खुला होणार; काय आहे प्राइस बँड?

Owais Metal and Mineral Processing: ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंगचा (Owais Metal and Mineral Processing) आयपीओ 26 फेब्रुवारीला खुला होणार आहे. यासाठी प्रति शेअर 83-87 रुपये अप्पर प्राइस बँड ठेवण्यात आला आहे.

राहुल शेळके

Owais Metal and Mineral Processing IPO: ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंगचा (Owais Metal and Mineral Processing) आयपीओ 26 फेब्रुवारीला खुला होणार आहे. यासाठी प्रति शेअर 83-87 रुपये अप्पर प्राइस बँड ठेवण्यात आला आहे. कंपनीने इश्यूमधून 42.69 कोटी उभारण्याची योजना आखली आहे.

आयपीओमध्ये 49.07 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील आणि गुंतवणूकदार 100 शेअर्सच्या लॉटमध्ये बोली लावू शकतील. 28 फेब्रुवारीला आयपीओचा शेवटचा दिवस असेल. शेअर्सची लिस्टिंग 4 मार्च रोजी एनएसई एसएमईवर आयपीओ शेड्युल्डनुसार होऊ शकते.

ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंग ही मध्य प्रदेशातील कंपनी आहे. ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड ही आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तर रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि मार्केट मेकर ग्रेटेक्स शेअर ब्रोकिंग आहे.

आयपीओमधील 50 टक्के पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. आयपीओनंतर कंपनीतील प्रमोटर्सची हिस्सेदारी 73 टक्क्यांवर येईल, जी सध्या 100 टक्के आहे.

ओवेस मेटल अँड मिनरल प्रोसेसिंगची सुरुवात 2022 मध्ये झाली. ही कंपनी मेटल्स आणि मिनरल्स तयार करते आणि त्यावर प्रक्रिया करते. त्याची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी मेघनगर, मध्य प्रदेशमध्ये आहे.

कंपनी आयपीओमध्ये नवीन शेअर्स जारी करून उभारलेल्या पैशाचा वापर इक्विपमेंट खरेदी करणे, वर्किंग कॅपिटलसाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी करेल. 31 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीचा महसूल 39.77 कोटी होता आणि निव्वळ नफा 7.65 कोटी होता.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, पण सुरक्षा कच्ची! बीएमसी मुख्यालयातील बॅग स्कॅनर बंद; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

Tenancy Agreement Rule: भाडेकरू आणि घरमालकांनो लक्ष द्या... सरकारकडून ‘नवीन भाडे करार २०२५’ लागू; काय आहेत नवे नियम?

Dondaicha News : दोंडाईचा नगर परिषदेत भाजपचा ऐतिहासिक विजय; नगराध्यक्षांसह ७ नगरसेवक बिनविरोध

Kolhapur Shivaji University: पदव्युत्तर अभ्यासकेंद्रांना कुलूप, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी महाविद्यालयांचा प्रस्ताव

Jaykumar Rawal : तोंडाला फेस आणणारी घोडदौड; दोंडाईचा निवडणुकीत नगराध्यक्षपद व ७ जागा बिनविरोध, मंत्री जयकुमार रावल यांचा वरचष्मा

SCROLL FOR NEXT